Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

सोलापूर जिल्हय़ातील चालुक्यकालीन मंदिरांच्या जतनाची मागणी
सोलापूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

प्रश्नचीन वैभवशाली संस्कृतीची परंपरा लाभलेल्या सोलापूर जिल्हय़ातील ग्रामीण भागात पूर्व व उत्तर चालुक्य काळातील विष्णू आणि शिवाची मंदिरे प्रश्नचीन भारतीय संस्कृतीची साक्ष देत उभी आहेत. परंतु ती दुर्लक्षित असल्याने त्यांचे जतन होणे गरजेचे आहे, असे मत इतिहास संशोधिका प्रश्न. डॉ. लता अकलूजकर व प्रश्न. डॉ. नभा काकडे यांनी व्यक्त केले.जिल्हय़ाच्या मोहोळ तालुक्यातील वडवळ व गोटेवाडी, मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, तारापूर, माढा तालुक्यातील केवड, जामगाव व बार्शी तालुक्यातील जामगाव आणि मालवंडी येथील पुरातन मंदिरांच्या स्थापत्याचे सर्वेक्षण डॉ. अकलूजकर व डॉ. काकडे यांनी केले. त्यांच्या समवेत डॉ. सत्यवत नूलकर, प्रश्न. डी. आर. माशाळकर व भुजंग बोबडे हे होते.

बनावट ना हरकत पत्र प्रकरण
कोल्हापूर आयुक्तांचे स्वीय सहायक, बांधकाम व्यावसायिकास कोठडी
कोल्हापूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक संजय रामचंद्र भोसले आणि एक बांधकाम व्यावसायिक किरण बळवंत मांगुरे या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नितीन पाटील यांनी आज २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. एका उद्योगपतीच्या मालमत्तेवर महापालिका प्रशासनाने थकीत घरफाळ्याचा सुमारे १ कोटी ५ लाख रूपयांचा बोजा कमी करण्यासाठी नगरभूमापन कार्यालयाला उपायुक्त गणेश देशमुख यांच्या सहीचे बनावट ना हरकत पत्र दिल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यापूर्वी या गुन्ह्य़ात उद्योगपतीचे इस्टेट मॅनेजर अरूण पाटील आणि तलाठी कृष्णात ज्ञानदेव तथा के.डी.पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापुरात ‘स्वाइन फ्लू’ आटोक्यात
कोल्हापूर, १४ ऑगस्ट /विशेष प्रतिनिधी

कोल्हापुरात ‘स्वाइन फ्लू’ची साथ आटोक्यात आल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘स्वाइन फ्लू’चा कक्ष उघडल्यापासून गेल्या आठ दिवसांत येथील आयसोलेशन रुग्णालयात दाखल झालेल्या १५ रुग्णांपैकी २ रुग्णांचे नमुने शुक्रवारी पॉझिटिव्ह असल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने कळविले. परंतु हे नमुने येण्यापूर्वीच संबंधित रुग्ण उपचाराअंती ठणठणीत बरे झाले असून उद्या त्यांना घरी पाठविण्यासंदर्भात डॉक्टरांशी विचारविनिमय सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

अखेर सांगलीतही दहीहंडी रद्द
गणेश जोशी, सांगली, १४ ऑगस्ट

मुंबई पुण्यात स्वाइन फ्लूमुळे दहीहंडीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्यानंतर सांगलीच्या वेशीवर स्वाइन फ्लूची साथ येण्याची भीती व्यक्त होत असताना राजकीय नेत्यांच्या दहीहंडीला बंदी घालण्याचे धाडस जिल्हा प्रशासनाला होत नव्हते. यासंदर्भात ‘लोकसत्ता’तून वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने मदन पाटील व डॉ. पतंगराव कदम यांनी पुरस्कृत केलेल्या दहीहंडीला परवानगी नाकारली असल्याचे लेखी कळविले आहे. त्यामुळे दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

स्वीय सहायकांच्या बदलीची मागणी
कोल्हापूर, १४ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेतील दीर्घकाळ वास्तव्य करून असलेल्या स्वीय सहायकांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. यावर प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरच बदल्या करीत असल्याचे आश्वासन दिले. ताराराणी सभागृहात ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी सभापती इंद्रजित सलगर होते.

माळढोक अभयारण्य प्रश्न महिन्यात सोडवू - पवार
सोलापूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

माळढोक अभयारण्यप्रश्नी कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांच्या प्रगतीस बाधा येईल, असा निर्णय घेण्यात येणार नाही आणि या प्रश्नाची उकल येत्या महिन्याभरात करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले. गेल्या अनेक दिवसांपासून माळढोक अभयारण्य क्षेत्र घोषित करण्याच्या प्रश्नावर चळवळ उभी करणाऱ्या ‘अ‍ॅडव्हान्टेज सोलापूर’च्या सदस्यांनी जिल्हा परिषदेने माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते बळीराम ऊर्फ काका साठे यांच्या नेतृत्वाखाली पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी जिल्हय़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. शिष्टमंडळाशी चर्चा करताना पवार यांनी अभयारण्याचे क्षेत्र कमीत कमी करून या परिसराच्या विकासासाठी येणारे अडथळे दूर करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या चर्चेत शिरीष गोडबोले, शिरीष जाधव, गोपाळ माडगोंडा व प्रमोद जोशी आदींनी भाग घेतला.

सोलापूर महापालिकेतील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून कर्मचारी बेपत्ता
सोलापूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला वैतागून सोलापूर महापालिकेचा एक कर्मचारी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात असून या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संजय सुरेश ओगले (वय ४५, रा. लिमयेवाडी) हे महापालिकेत लेखापाल विभागात नेमणुकीस आहे. परंतु तेथील लेखापाल फत्तेसिंह चौहान यांच्याकडून त्यांना सातत्याने त्रास देऊन निलंबित करण्याची धमकी देण्यात येत असल्याने ते वैतागले होते. त्यांना चौहान यांच्याकडून मोबाईलवरून पुन्हा शिवीगाळ व निलंबनाची धमकी आल्याने ओगले यांनी तसे पत्र लिहून ते घरातून सकाळी निघून गेले. त्यानंतर ते पालिकेत गेले नाहीत किंवा घरीही परतले नाहीत, असे त्यांच्या पत्नी संपदा ओगले यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत ओगले हे हरविल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.

सुशिक्षित बेकार स्थापत्य अभियंत्यांचे सोमवारी उपोषण
सोलापूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी
सुशिक्षित बेकार स्थापत्य अभियंत्यांना ३३ टक्के कामे देण्याचे आश्वासन देऊन नऊ महिने उलटले तरी त्याची कार्यवाही होत नसल्याच्या विरोधात सोलापूर जिल्हा सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता असोसिएशनने भीमा कालवा मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर येत्या सोमवारी(दि. १७) उपोषण करण्याच्या निर्णय घेतला आहे. अधीक्षक अभियंता लांडेकर यांनी नियम धाब्यावर बसवून कंत्राटी काम एकाच कंत्राटदाराला दिल्याचा आरोपही मिलिंद भोसले यांनी केला आहे.

पंढरपूरमध्ये मिनी बससेवा सुरू
पंढरपूर, १४ ऑगस्ट/वार्ताहर

राज्य परिवहन महामंडळाने शहर व उपनगरातील नागरिक, आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी मिनी बस सेवा चालू केली आहे. उपनगरातील रहिवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होत असून या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी केले. गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर परिचारक यांच्या हस्ते शिवाजी चौक या ठिकाणी बसची पूजा करून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सतीश मुळे, पांडुरंग सह. अध्यक्ष दिनकर मोरे, प्र. वी. कुलकर्णी, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष कटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागरी बँकांनी खुल्या स्पर्धेला समर्थपणे सामोरे जावे - परिचारक
सोलापूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरणाच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे बँकिंग क्षेत्रापुढे अनेक नवनवीन समस्या व आव्हाने कायम आहेत. यापुढेही ही आव्हाने राहणार आहेत. तेव्हा नागरी बँकांनी या खुल्या अर्थव्यवस्थेत स्पर्धेला समर्थपणे सामोरे गेल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी केले. नागरी बँक्स असोसिएशनची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. संस्थेचा अहवाल, आर्थिकपत्रके, वाढाव्याची वाटणी, अंदाजपत्रक इ. बाबींवर खुली चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेष फलमारी, जगदीश तुळजापूरकर, शशिकला मोरे, दाते, कोल्हापुरे आदी उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रातील प्रत्येकाने आपापल्या कामकाजाबद्दल जागरुक राहून पारदर्शक कारभार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना परिचारक यांनी महाराष्ट्र राज्य नागरी बँक्स फेडरेशन व नागरी बँक्स असोसिएशन नागरी बँकांच्या पाठीशी कायम पाठीशी राहतील, असा विश्वास बोलून दाखविला.

रिक्षा कागदपत्र तपासणीची मोहीम
सांगली, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सांगली शहरातील सर्वप्रकारच्या तीन आसनी रिक्षांचे लायसन्स, बॅच तपासणीची मोहीम १५ ऑगस्टपासून राबविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिली. तीन आसनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी निकेश खाटमोडे-पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. एन. नलावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत ठरल्यानुसार शहरातील सर्व तीन आसनी रिक्षांचे लायसन्स, बॅच तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मौलाना आझाद महामंडळाचे कर्जमाफीसाठी आंदोलन
सातारा, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमाफीचा अध्यादेश अद्याप न निघाल्याने अल्पसंख्याक समाज संतप्त झाला असून, याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी शमशुद्दीन आतार व कार्याध्यक्ष रशीदभाई बागवान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील विविध आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमाफीची घोषणा केली व तसे अध्यादेशही काढले. इतर सर्व महामंडळांना कर्जमाफीचे अध्यादेश प्रश्नप्त झाले मग मौलाना आझाद महामंडळाच्या अध्यादेशाचे घोडे कुठे पेंड खात आहे, असा सवाल मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनने विचारला असून, या प्रश्नावर व्यापक लढा उभारण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हसन पठाण, जिल्हा संघटक अब्दुल सुतार, जिल्हा सरचिटणीस आरीफ बागवान, आयुब मोकाशी, महंमद झारी, यासिन मुलाणी आदी कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

महापालिका समस्यांवर सोलापुरात अभिनव दहीहंडी
सोलापूर, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरातील विविध समस्यांना सामोरे ठेवून भारतीय विद्यार्थी सेनेने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अभिनव अशी नागरी समस्यांनीयुक्त दहीहंडी उभारून जनतेचे लक्ष वेधले. या दहीहंडीला शहरातील खड्डे, पालिकेतील भ्रष्टाचार, आजारी आरोग्य यंत्रणा, शाळांची दयनीय अवस्था, हद्दवाढीबद्दल उदासीनता आदी समस्यांचे फलक लावण्यात आले होते. तसेच निषेध म्हणून कांदे, बटाटे, दोडके आदी लावण्यात आले होते. मध्यभागी या समस्यांची दहीहंडी पालिका कधी फोडणार असा प्रश्न करणारा फलक लावण्यात आला होता. हे दहीहंडीचे आगळे आंदोलन महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, लहू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

एमसीएसच्या आयटी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट कॉलेजचे आज उद्घाटन
कराड, १४ ऑगस्ट/वार्ताहर

कराडमध्ये १४ वर्षे सक्षमपणे कार्यरत असलेल्या एमसीएस कॉम्प्युटर्स या अग्रगण्य संगणकप्रशिक्षण संस्थेच्या एमसीएस कॉलेज ऑफ आयटी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट या माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन शाखेच्या महाविद्यालयाचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. १५) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.पंताचा कोट येथे होणाऱ्या या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शारदा जाधव या राहणार आहेत तर उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, प्रश्नंताधिकारी नीलिमा धायगुडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन एमसीएसचे कार्यकारी संचालक सुनील चव्हाण व सौ. स्नेहल चव्हाण यांनी केले आहे.

दारू , गुटखाबंदीचा बहिरेवाडीत निर्णय
पेठवडगाव, १४ ऑगस्ट / वार्ताहर
फेरमतदानाच्या आग्रहातून आपला संकल्प यशस्वी करणाऱ्या वाठार या हातकणंगले तालुक्यातील गावापाठोपाठ पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी या गावानेही दारूबंदीसह गुटखाबंदी निर्णय ग्रामसभेत घेऊन गावच्या विकासकामाच्या आदर्शात याचीही भर घालणार असल्याने स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेकडे सर्वाचेच उत्सूकतापूर्ण लक्ष लागून राहिले आहे. वारणानगर शेजारीच असलेल्या बहिरेवाडी गावाने गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामांचा आदर्श निर्माण केला असून नुकत्याच तेथे झालेल्या कार्यक्रमात या गावचा आदर्श सर्वानी घ्यावा असे आवाहन मंत्री विनय कोरे यांनी केले होते. तर या विकासकामांचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही विशेष कौतुक केले होते. मंदिरातील वास्तुशांती प्रतिष्ठापना व सभागृह नामकरण असा हा कार्यक्रम झाला. सरपंच रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील या विकासकामातून बहिरेवाडी गावाला शासनाचा ग्रामस्वच्छता अभियानचाही पुरस्कार मिळाला असून त्यांची वाटचाल आता ग्लोबल व्हिलेजकडे आहे.

‘टिमवि’च्या संस्कृत परीक्षेत वैष्णवी भोसले प्रथम
सोलापूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी
पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शालेय प्रसार संस्कृत परीक्षा विभागामार्फत घेतलेल्या संस्कृत परीक्षेत येथील सिद्धेश्वर कन्या प्रशालेची कु. वैष्णवी दत्ता भोसले हिने ९३ गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले. वैष्णवी हिला संस्कृत अभ्यास व परीक्षेसाठी शिक्षिका तृप्ती कुलकर्णी, अश्विनी पतकी, शशिकला शेळके व निवृत्त शिक्षिका रुक्मिणीबाई केत यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला शीलवंत यांनी तिचे अभिनंदन केले. कु. वैष्णवी ही छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील शिपाई दत्ता भोसले यांची कन्या आहे.

वंृदावन कॉलनीमधील डांबरीकरणाचा प्रश्नरंभ
सांगली, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी
राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मदन पाटील यांच्या हस्ते सांगलीतील वंृदावन कॉलनीमधील रस्ता डांबरीकरणाचा प्रश्नरंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी २ लाख ३७ हजार रुपयांचा निधी पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध झाला असून या कामी स्थानिक नागरिकांचाही मोठा पुढाकार आहे. महिला व बालकल्याण मंत्री मदन पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आणि फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्रीमती सुनीता पाटील, संतोष पाटील, श्रीमती मदीना माकडवाले, मुबारक मौलवी, श्री. के. मारियादास यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
सोलापूर, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी
सोलापुरात रेल्वेची धडक बसून मृत्युमुखी पडलेल्या पाच मुलांच्या नातेवाइकांना रेल्वे प्रशासनातर्फे त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी दोन लाख, तर दोघा जखमींना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार या सानुग्रह अनुदानाचे धनादेश शुक्रवारी तातडीने वितरित करण्यात आले. साईप्रसाद नागनाथ सब्बन (वय १०), रवीकुमार गोपाल येनगंदूल (१५), साईनाथ लालप्पा पोगूल (१९), व्यंकटेश बत्तूल (१४) व अनिल अंबादास पेरला (१४) या सर्व नीलमनगरात राहणाऱ्या मृत मुलांच्या वारसदार आई-वडिलांना ओ. पी. केसरी, डॉ. जगदीश पाटील, डॉ. भूषणकुमार उपाध्याय आदींच्या हस्ते प्रत्येकी दोन लाखांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

जनसुराज्य शक्तीने जतमध्ये धनगर उमेदवार देण्याची मागणी
जत, १४ ऑगस्ट/ वार्ताहर
जत तालुक्यात धनगर समाजाची ताकद मोठी आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने धनगर समाजाला उमेदवारी द्यावी. तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज एकत्र येऊन त्या उमेदवाराला निवडून देतील, असे स्पष्ट मत जनसुराज्य शक्तीचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. म्हाळाप्पा पुजारी यांनी व्यक्त केले.

प्रश्न. संभाजीराव देसाई यांचा सेवानिवृत्ती निमित्त रविवारी सत्कार
कराड, १४ ऑगस्ट/वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख व शिवाजी विद्यापीठाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रश्न. संभाजीराव देसाई, तसेच मराठीच्या प्रश्नध्यापिका सौ. सरलादेवी निकम यांचा येत्या रविवारी (दि. १६) सायं. साडेचार वाजता महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहामध्ये सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न होत असून ‘रयत’चे कार्याध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब िशदे अध्यक्षस्थानी असणार आहेत. माजी खासदार देसाई यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रश्नचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले आहे.