Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘उमंग’, ‘मल्हार’ पुढे ढकलले!
प्रतिनिधी

स्वाईन फ्लूमुळे देशात घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अनेक जण आवश्यक ती

 

काळजी घेताना दिसत आहेत. सरकारने दिलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये, मल्टिप्लेक्स काही दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच स्वाईन फ्लूचा परिणाम कॉलेज फेस्टिव्हल्सवरही झाला आहे. ‘उमंग’ आणि ‘मल्हार’ हे फेस्टिव्हल्स याच आठवडय़ात सुरू होणार होते, मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहेत. ‘उमंग’ तर ठरलेल्या दिवशी सुरू झाला; मात्र त्याच दिवशी संध्याकाळी तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तो पुन्हा कधी आयोजित केला जाईल हे अजूनही अनिश्चित आहे. तर ‘मल्हार’ पुढे ढकलण्यात आला असून तो २९ आणि ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही मोजकेच इव्हेंट्स, ‘झेड’ व साऊथ आफ्रिकन ब्रॅण्ड ‘प्रश्नइम सर्कल’ यांचा परफॉर्मन्स यांनी ‘उमंग’ची सुरुवात झाली खरी; पण त्यास उपस्थित असलेल्या कॉलेज गोअर्सची संख्या कमी असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. एरवी गर्दीने फुलून जाणारा एनएम कॉलेजचा कॅम्पस या वेळी मात्र स्वयंसेवक व मोजक्याच विद्यार्थ्यांनी अध्र्यापेक्षाही कमी भरला होता.
‘प्रश्नईम सर्कल’च्या वेळी पावसाने अनपेक्षितपणे हजेरी लावली. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडली. मात्र कोटय़वधींची उलाढाल असणारे हे महत्त्वाचे फेस्टिव्हल्स आता कशा पद्धतीने पुन्हा आयोजित करायचे याबाबत आयोजक विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.
राज्य सरकारने एक आठवडाभर सर्व शाळा व कॉलेजेस बंद ठेवण्याची सूचना केल्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजचे प्रश्नचार्य फ्रेजर मॅस्करेन्स् यांनी ‘मल्हार’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयास आम्ही बांधील आहोत व त्याचा आम्ही आदर करतो. अशा पेचप्रसंगी ‘मल्हार’ पुढे ढकलणेच योग्य ठरेल. त्यामुळे आता ‘मल्हार’ २९ व ३० ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येईल, असे प्रश्नचार्य मॅस्करेन्स् यांनी सांगितले.
दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे ‘मल्हार’ २९ व ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला असला तरी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रम होईल, असे सांगून प्रश्नचार्य मॅस्करेन्स् म्हणाले की, ‘मल्हार’ सर्वासाठीच सुरक्षितपणे पार पडावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणूनच यंदा ‘मल्हार’मध्ये फक्त मुंबईतील कॉलेजेसनाच सहभागी होता येईल. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बाहेरगावच्या कॉलेजेस्मधील विद्यार्थ्यांना यंदा ‘मल्हार’मध्ये आमंत्रित करण्यात येणार नाही. तसेच ‘मल्हार’मध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. ‘मल्हार’ ज्या दिवशी होणार आहे तेव्हा झेवियर्सच्या कॅम्पसमध्ये डॉक्टरांना बोलावण्यात येणार आहे. ‘मल्हार’ विलंबाने होत असला तरीही तो दरवर्षीसारखाच दणक्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.