Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अल्पउत्पन्न गटातील रुग्णांसाठी आज मुंबईत उपचार शिबीर
प्रतिनिधी

सौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या त्वचा विकारांविषयी रुग्ण अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे

 

त्यातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी जे जे सल्ले मिळतात ते ताबडतोब अमलात आणण्यासाठी सारेचजण जिवाचा आटापिटा करतात, प्रसंगी अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करूनही त्वचाविकारांपासून मुक्तता मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी त्या त्वचाविकाराचे नेमके कारण समजून घेण्याचा प्रयत्न होत नाही, उलटपक्षी केवळ वरवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे तो त्वचाविकार पूर्णत: बरा न होता वारंवार आपले डोके वर काढतो. सोरायसीस, ल्युकोडर्मा यासारख्या त्वचाविकारांवर होमिओपॅथीमध्ये हमखास उपाय असतो, असा दावा डॉ. महेंद्र काब्रा यांनी केला आहे.
होमिओपॅथीमध्ये एम. डी. पदवी संपादन केलेले डॉ. महेंद्र काब्रा हे मुंबई, जळगाव, तसेच इंग्लंडमध्ये होमिओपॅथीचा प्रसार आणि प्रॅक्टिस करतात. रुग्णसेवेचा वारसा आपल्या वडिलांपासून घेतलेल्या डॉ. महेंद्र काब्रा यांना जागतिक होमिओपॅथी परिषदेनेही गौरविले आहे. सामाजिक जाणिवेपोटी ते अत्यंत अल्प मोबदल्यात त्वचा, तसेच हृदय रुग्णांवर उपचार करतात. याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्ट रोजी मुंबईत त्यांनी अल्पउत्पन्न गटांतील रुग्णांसाठी उपचार शिबिर आयोजित केले आहे.
होमिओपॅथीचे उपचार अतिशय मंद होत असतात, हा गैरसमज असून, हे उपचार शरीरातील अंतर्गत दोष, रोगाचे मूळ कारण नष्ट करतात, असे डॉ. महेंद्र काब्रा यांनी सांगितले. शरीरातील दोष शरीरावाटे उत्सर्जित होतात, तेव्हा त्वचारोग संभवतात. म्हणून रोगाचे मूळ कारण नष्ट करण्याकडे होमिओपॅथीचा कल असतो, असेही ते म्हणाले. होमिओपॅथी उपचारांमुळे त्वचारोग नष्ट अथवा कमी होऊन त्वचा नितळ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या बोलबाला असलेल्या स्वाईन फ्लूबद्दल सांगताना ते म्हणाले, की ज्यांची प्रतिकारशक्ती क्षीण असते, त्यांना स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींनी आपली प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करायला हवा. अस्थमा, हृदयविकार, तसेच स्थूलता असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आहारविहाराला व्यायामाची जोड मिळणे आवश्यक आहे. प्रश्नमुख्याने श्वसनाचे व्यायाम आणि योगप्रकारामुळे आरोग्य सुधारते. होमिओपॅथीच्या उपचारांमुळे दीर्घकालीन आजारांपासूनही मुक्तता मिळते. मात्र तो आजार कितपत गंभीर आहे, त्यावर बरे होण्याची मुदत अवलंबून असते. त्यांनी केलेल्या होमिओपॅथीच्या एकात्मिक उपचारपद्धतीमुळे आजवर हजारो रुग्णांचा आराम मिळाला असल्याचा दावा डॉ. महेंद्र काब्रा यांनी केला आहे. १५ ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९८२०१९१८३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.