Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ,‘अस्तित्व’ची स्पर्धा ऑक्टोबरमध्ये
प्रतिनिधी

एकांकिका स्पर्धाच्या वर्तुळात मानाची समजली जाणारी ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक

 

आविष्कार अनेक’ यंदा ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यंदा या स्पर्धेचे कल्पनासूचक असून, त्यांनी एकांकिका सादरीकरणासाठी ‘काश! असं झालं असतं तर’ हा विषय सुचवला आहे. स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे मागच्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी हा विषय घोषित झाला होता आणि मराठी नाटय़वर्तुळात सध्या याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
जगण्याचा जमाखर्च मांडताना सहज मागे वळून पाहताना आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक, राजकीय पर्यावरणातल्या अनेक गोष्टींनी अस्वस्थ होतो. एखादी गोष्ट त्या-त्या वेळेवर झाली असती तर किंवा जे घडलंय त्यापेक्षा काही वेगळे घडले असते तर.. यातूनच ‘काश! असं झालं असतं तर’ हाच विचारांचा ‘ल.सा.वि.’ असतो. या विषयाचे अधिक विस्तृत स्पष्टीकरण रत्नाकर मतकरी यांनी केले असून स्पर्धकांसाठी ते अस्तित्वच्या \६६६.ं२३्र५ं.ू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नवोदित रंगकर्मीबरोबरच व्यावसायिक कलावंतानाही आपल्या क्षमता आजमावण्याची संधी देणाऱ्या या खुल्या गटाच्या एकांकिका स्पर्धेची प्रश्नथमिक फेरी २६ व २७ सप्टेंबरला तालिम स्वरुपात होणार असून अंतिम फेरी ३ ऑक्टोबरला मुंबईतल्या माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिर येथे होईल. ही स्पर्धा इंडियन नॅशनल थिएटरच्या प्रशासकीय सहयोगाने होत असून स्पर्धेचे प्रवेश अर्ज आय.एन.टी., १९/२१, बॉम्बे म्युच्युअल चेंबर, दुसरा मजला, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०००२३ येथे तसेच अस्तित्वच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- २२६५०३६१/ ९८२१०४४८६२/ ९८७०३३६७९३.