Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

काळ्या-पिवळ्या टॅक्सींत ‘एसी’
प्रवाशांची लूट करण्याचा खुला परवाना?
कैलास कोरडे
एकाच हॅण्डसेटमध्ये जीएसएम आणि सीडीएमए नेटवर्क असलेल्या मोबाइलप्रमाणे काळ्या-पिवळ्या टॅक्सी साध्या व वातानुकूलित म्हणून वापरण्यास परवानगी देण्याविषयी चाचपणी करण्याची सूचना राज्य शासनाने मुंबईतील आरटीला केली आहे. मात्र अशा प्रकारची परवानगी देणे म्हणजे टॅक्सीचालकांना प्रवाशांची लूट करण्याचा खुला परवाना देण्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया वाहतूक क्षेत्रातून उमटत आहे.

सीआरझेडचे काय?
केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री जयराम रमेश यांनी मुंबईतील समस्त एलआयजीवासीयांना सीआरझेडपासून दिलासा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सीआरझेडमध्ये येणाऱ्या दक्षिण मुंबईतील अनेक चाळी, जुन्या इमारती तसेच म्हाडा आणि काही खासगी इमारतीवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. रमेश यांनी एलआयजीवासीयांसाठी ही सवलत दिल्यामुळे लहान घरात राहणाऱ्यांचे मोठय़ा घराचे स्वप्न पूर्ण होण्यात अडचण येईल असे आज तरी वाटत नाही.

मुंबईत आकाराला आले बच्चेकंपनीसाठी पार्क
प्रतिनिधी

लहान बाळांपासून ते १० वर्षावरील मुलांच्या आवडी व गरजा लक्षात घेऊन पाच झोनमध्ये विभागलेली समुद्रकिनाऱ्यावरची बाग, मासे व मुलांचे खास आकर्षण असलेल्या जंगली प्रश्नण्यांचे भव्य पुतळे आणि खास डेन्मार्कहून लहान मुलांसाठी मागविलेली खेळणी असे एक सुंदर पार्क मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावर उभे राहणार आहे. राज श्रॉफ यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेले हे पार्क बच्चेकंपनीसाठी नक्कीच आकर्षण ठरेल.

‘कृष्णा : हिस्ट्री ऑर मिथ’
शोध भगवान श्रीकृष्णांच्या अस्तित्वाचा
प्रतिनिधी

कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभर सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येतो. तरीसुद्धा भगवान श्रीकृष्ण खरेच होते की नाही, द्वारका अस्तित्वात होती की नाही याविषयी अनेकदा चर्चा केली जाते. दंतकथा म्हणूनही याकडे पाहिले जाते. म्हणूनच अनिवासी भारतीय डॉ. मनीष पंडित यांनी ‘कृष्णा : हिस्ट्री ऑर मिथ’ या नावाचा लघुपट बनवला आहे. महाभारत घडले की ते एक कल्पित महाकाव्य होते, याविषयीच्या चर्चेला उत्तर देण्याचा प्रयत्न डॉ. मनीष पंडित यांनी या लघुपटाद्वारे केला आहे. अजिबात कुठेही प्रचारकी थाट न आणता अतिशय संयत पद्धतीने खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्राचे पुरावे देत भगवान श्रीकृष्णाच्या अस्तित्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

‘उमंग’, ‘मल्हार’ पुढे ढकलले!
प्रतिनिधी

स्वाईन फ्लूमुळे देशात घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अनेक जण आवश्यक ती काळजी घेताना दिसत आहेत. सरकारने दिलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये, मल्टिप्लेक्स काही दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच स्वाईन फ्लूचा परिणाम कॉलेज फेस्टिव्हल्सवरही झाला आहे. ‘उमंग’ आणि ‘मल्हार’ हे फेस्टिव्हल्स याच आठवडय़ात सुरू होणार होते, मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहेत. ‘उमंग’ तर ठरलेल्या दिवशी सुरू झाला; मात्र त्याच दिवशी संध्याकाळी तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तो पुन्हा कधी आयोजित केला जाईल हे अजूनही अनिश्चित आहे. तर ‘मल्हार’ पुढे ढकलण्यात आला असून तो २९ आणि ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रश्नमुख्याने व्हायोलिन वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नाना साठे यांनी चित्रपटसृष्टी - नाटकात अभिनय, नभोवाणीसाठी लेखन, संगीत दिग्दर्शन, श्रुतिका कलाकार, विनोदी लेखन, गीतलेखन असा विविध क्षेत्रांत पाच दशकांहून अधिक काळ वावर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही नानांनी व्हायोलिन धडे दिले होते. १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रकाश चान्दे यांनी त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा.परवाच्या १० ऑगस्टला ज्यांची जन्मशताब्दी सुरू झाली, त्या नाना साठे यांचे खरे नाव वासुदेव साठे. पण काही माणसे त्यांच्या घरगुती नावांनी इतकी लोकप्रिय होतात की, त्यांचे खरे नावच लोक विसरतात. नानांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट घडली की ते व्हायोलिनवादक म्हणून दीर्घकाळ प्रसिद्ध पावले असले तरी नाटक, नभोवाणी येथे त्यांनी अभिनेता म्हणूनही दीर्घकाळ काम केले. त्यांनी कविता केल्या; गीतलेखन केले.

सहआयुक्तांचे मत डावलून सल्लागारांनाच ७५ कोटींचे काम
संदीप आचार्य

गेल्या दोन वर्षामध्ये पालिका आयुक्त जयराज फाटक हे त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका व निर्णयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कधी शाळेतील मुलांना दुधातून झालेल्या विषबाधेच्या मुद्यावरील त्यांचे मत असो की स्वाइन फ्लू प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या भावना पायदळी तुडवून ‘एसएमएस'वर आधारित निर्णय घेण्याची भूमिका असो. प्रत्येक वेळी आयुक्तांनी आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न केला आहे. या साऱ्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी आता त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

रक्तचाचणीचा चुकीचा अहवाल; इस्पितळाकडून भरपाई
प्रतिनिधी

एका रुग्णाच्या रक्ताचा चुकीचा ‘सीकेएमबी’ चाचणी अहवाल देऊन या रुग्णाला नाहक मनस्ताप देणे व आठवडाभर रुग्णालयात दाखल व्हायला लागणे याची भरपाई म्हणून गिरगावातील सर हरकिशनदास नरोत्तमदास इस्पितळाने या रुग्णास २० हजार रुपये द्यावेत, असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

अल्पउत्पन्न गटातील रुग्णांसाठी आज मुंबईत उपचार शिबीर
प्रतिनिधी

सौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या त्वचा विकारांविषयी रुग्ण अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्यातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी जे जे सल्ले मिळतात ते ताबडतोब अमलात आणण्यासाठी सारेचजण जिवाचा आटापिटा करतात, प्रसंगी अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करूनही त्वचाविकारांपासून मुक्तता मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी त्या त्वचाविकाराचे नेमके कारण समजून घेण्याचा प्रयत्न होत नाही, उलटपक्षी केवळ वरवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जातो.

उद्या निळू फुले श्रद्धांजली सभा
प्रतिनिधी

नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेते निळू फुले यांना आदरांजली वाहण्यासाठी अ. भा. मराठी नाटय़ परिषदेने येत्या रविवारी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलामधील तळमजल्याच्या तालीम हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे. या सभेत नाटय़-चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर निळू फुले यांना आदरांजली वाहतील.

गुरव समाजातर्फे आज विद्यार्थी गुणगौरव
प्रतिनिधी

अखिल गुरव समाज संस्था, मुंबईतर्फे समाजातील इयत्ता पहिली ते पदवी/ पदविकापर्यंत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच समाजातील ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांचा व गुणवंत व्यक्तींचा सत्कार समारंभ दि. १५ ऑगस्ट २००९ रोजी दु. ३.०० वाजता शारदा मंगल कार्यालय, शारदा सिनेमाजवळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे.

सिद्धकलातर्फे संगीतकार अनिल मोहिले पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी

सिद्धकला संगीत अकादमीच्या वतीने गेल्या रविवारी सहयोग मंदिरात आयोजित एका सोहळ्यात संगीतकार अनिल मोहिले पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गायक वसंत आजगांवकर तर विशेष पाहुणे म्हणून रवींद्र आवटी उपस्थित होते. गायक अनिल हजारे, गायिका नीलाक्षी पेंढारकर, संगीत संशोधक डॉ. विद्याधर ओक आणि तालवाद्यकार ज्ञानेश्वर ढोरे यांना यंदा संस्थेच्या वतीने अनिल मोहिले पुरस्कार देण्यात आले. यावेळी संगीतकार अनिल मोहिले आणि संस्थेचे संचालक डॉ. किशोर भिसे उपस्थित होते. डॉ. किशोर भिसे यांनी संस्थेची तसेच पुरस्कारांची माहिती दिली. पुरस्कारप्रश्नप्त कलावंतांनी यावेळी कला सादर केली. नीलाक्षी पेंढारकर यांनी स्वयंवर नाटकातील पदे, एक लावणी आणि जोहार मायबाप ही गाणी सादर केली. ज्ञानेश्वर ढोरे यांनी ढोलकी वाजवून रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. डॉ. विद्याधर ओक यांनी २२ श्रुतींच्या हर्मोनिअमवर विविध लोकप्रिय गाणी वाजवली. तसेच अनिल हजारे यांनी तलत महेमूद यांची गाणी सादर केली. अरुंधती भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘नरी गांधी’ पुस्तकातून उलगडणार वास्तूकलेचे सौंदर्य आणि मर्म!
प्रतिनिधी

प्रसिद्ध वास्तूविशारद दिवंगत नरी गांधी यांच्यावर लिहिलेल्या ‘नरी गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १८ ऑगस्ट रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात होत आहे. प्रश्न. एच. मसूद ताज यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून नरी गांधी यांनी आजवर केलेल्या विविध कामांचे वास्तूसौदर्य आणि मर्म उलगडणार आहे. मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या एका कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून हे पुस्तक आर्ट अ‍ॅण्ड डिझाईन बुक प्रेस फाऊंडेशन फॉर आर्किटेक्ट यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकाची मांडणी व सजावट प्रणव उपासनी व यशवंत पीटकर यांची आहे. १६४ पानांच्या या पुस्तकात गांधी यांनी केलेल्या वास्तूरचनांच्या कामांची ८७ रंगीत छायाचित्रे देण्यात आली आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गांधी यांनी केलेल्या विविध कामांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही जे. जे. कला महाविद्यालयात भरविण्यात येणार असून हे प्रदर्शन येत्या २२ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत खुले आहे.