Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

वेध विधानसभेचा
‘मराठी’ मुद्राच विजयाची समीकरणे ठरवणार !
मुंबई- उत्तर

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील बोरिवली (१५२), दहिसर (१५३), मागठाणे (१५४), कांदिवली पूर्व (१६०), चारकोप (१६१) आणि मालाड प. (१६२) या सहापैकी तीन मतदारसंघांत चुरशीच्या तिरंगी लढती अटळ आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर शिवसेना-भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व होते. मात्र भाजप- शिवसेनेच्या राम नाईक यांच्या विरुद्धच्या लढतीत मनसेच्या शिरीष पारकर यांनी मराठी मतांवर अनपेक्षित असा मोठा डल्ला मारल्याने हिंदी भाषकांची बहुतांशी एकगठ्ठा मते घेणाऱ्या काँग्रेसच्या संजय निरुपम यांना खासदारपदाची अवचित लॉटरी लागली. धक्कादायक अशा या निकालाने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदलून गेले आहे.

पक्षनिष्ठेपेक्षा लक्ष्मी ठरणार श्रेष्ठ
कल्याण व डोंबिवली

ठाणे लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व , कल्याण पश्चिम , डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण हे विधानसभेचे चार नवीन मतदारसंघ निर्माण झाले आहेत. जवळच उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आहेत. कल्याण डोंबिवली , उल्हासनगर पालिकेत युती , अंबरनाथ नगरपालिकेत युतीचा कारभार , या भागातील बहुतांशी ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात. त्यामुळे हे सर्व मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. या सर्व भागात भाजप , काँग्रेस , राष्ट्रवादीचा प्रभाव पक्षांतर्गत धुसफुसीमुळे काही प्रमाणात जाणवतो. कल्याण एक मतदारसंघ होता आता त्याचे चार मतदारसंघ झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या तितक्याच प्रमाणात वाढली आहे.

.. तरच आघाडीचे जय हो!
भिवंडी
मागील काही निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसपक्षाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नव्यानेच निर्माण झालेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघातून मिळालेल्या दणदणीत विजयामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. या विजयामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या असून , कार्यकर्त्यांमध्येही आत्मविश्वासाचे वातावरण आहे. त्यातच या मतदारसंघात राष्ट्रवादीचीही ताकद चांगली असल्याने आघाडी म्हणून दोन्ही काँग्रेसने भिवंडी लोकसभा मतदार संघातील विधानसभेची निवडणूक एक दिलाने लढविली तर त्यांचा विजयरथ रोखताना शिवसेना-भाजपा युतीची दमछाक होऊ शकते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण , शहापूर , मुरबाड , भिवंडी पूर्व-पश्चिम , कल्याण पश्चिम असे सहा मतदारसंघ येतात. त्यापैकी भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असून , भिवंडी ग्रामीण मतदारसंघात दिघासी , अनगाव , पडघा हा भिवंडी तालुक्यातील तर वाडा तालुक्यातील काही भागाचा या मतदारसंघात समावेश होतो.

महाराष्ट्रातील चळवळ पुनश्च आरंभ
डिजिटल तंत्रज्ञानाने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांत नवा उत्साह संचारला , घराबाहेर जाऊन चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. याचा लाभ महाराष्ट्रात चळवळ पुढे नेण्यासाठी फेडरेशनने उठवायचे ठरविले आणि १९९९ च्या पुण्यात झालेल्या फिल्म सोसायटींच्या अखिल भारतीय परिषदेनंतर फेडरेशनने ‘ महाराष्ट्र चॅप्टर ’ ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. २००० साली महाराष्ट्र चॅप्टरची स्थापना झाली. तेव्हा महाराष्ट्रात फक्त चार फिल्म सोसायटय़ा होत्या. मुंबईत प्रभात चित्र मंडळ , पुण्यात आशय फिल्म क्लब , नाशिकमध्ये ‘ फाळके फिल्म सोसायटी ’ आणि सोलापूरला ‘ सोलापूर फिल्म सोसायटी ’ या चारापैकी फक्त ‘ प्रभात ’ ची सदस्य संख्या ७०० होती. फाळके फिल्म सोसायटी १००/१५० , सोलापूर फिल्म सोसायटी १०० व आशय मधल्या काळात बंद पडून पुन्हा नव्याने सुरू झाली होती. त्यांचे सदस्य ४५० होते.