Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

गोंधळाचे वातावरण संपून उपचारात स्थिरता
मिलिंद कांबळे

१९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्याने निम्मे पुणे पाण्यात बुडाले. ते संकट इतके आकस्मिक होते की, संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोसळली. दोन वर्षापूर्वी सार्सच्या साथीने या यंत्रणेला खडबडून जागे केले होते; परंतु देशात लाखो कोंबडय़ा नष्ट कराव्या लागल्या, तसेच संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला. मात्र या साथीची फारशी झळ लोकांना बसली नाही.

शहरात रक्ताचा तुटवडा; भीती न बाळगता रक्तदानाचे आवाहन
पुणे, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’च्या भीतीमुळे रक्तदानाचे उपक्रम थांबले असल्याने शहरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता रुग्णांचे प्रश्नण वाचविण्यासाठी रक्तदान करावे, असे आवाहन शहरातील रक्तपेढय़ांकडून करण्यात आले आहे.

‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधासाठी ‘इनफ्ल्यूएनझियम’ निरूपयोगी - डॉ. हब्बू
पुणे, १४ ऑगस्ट/ खास प्रतिनिधी
संसर्गजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक म्हणून ‘इनफ्ल्यूएनझियम’ हे होमिओपॅथीतील औषध प्रभावी असल्याचे वृत्त पसरल्याने शहरातील होमिओपॅथी औषध विक्रेत्यांच्या दुकानांसमोर कालपासून मोठमोठाल्या रांगा लागल्या. तथापि, ‘फ्लू’ रोखण्याच्या दृष्टीने ते निरुपयोगी असल्याचे स्पष्टीकरण नामवंत होमिओपॅथ डॉ. अनिल हब्बू यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.

‘स्वाइन फ्लू’मुळे मंत्र्यांनी घरात बसायचे का?
पुण्यात मेक्सिको पॅटर्न राबविणार नाही-अजित पवार
पिंपरी, १४ ऑगस्ट/प्रतिनिधी

सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नका, असे सांगत स्वत: जाहीर कार्यक्रमांसाठी आलेल्या पालकमंत्री अजित पवार यांनी स्वाइन फ्लू झाला म्हणून मंत्र्यांनी घरात बसायचे का, असा मुद्दा पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. अशा संकटाच्या वेळी आम्ही दिसलो नाही तरी मंत्री कुठे गेले, असे म्हणायला मोकळे, असेही ते म्हणाले. पुण्यात मेक्सिको पॅटर्न राबविणार नाही. तशी परिस्थिती येथे नाही, याचा पवार यांनी या वेळी पुनरुच्चार केला.

सर्जनशीलता फुलविणारे उपक्रम
विद्यार्थ्यांना शाळा ही तुरुंग न वाटता उद्यान वाटावे आणि या उद्यानात विद्यार्थी फुलपाखरांसारखे फुलावेत तसेच शाळा ही विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक बंदीवास न ठरता त्यांच्या नैसर्गिक सर्जनशीलतेला फुलविणारे आनंद निदान ठरावे यासाठी दौंडमधील शेठ जोतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरितसेनेतर्फे पर्यावरण पूरक उपक्रमांचे वर्षभरात कल्पकतेने आयोजित केले जाते. प्रशालेतील हरितसेनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, संवर्धन व त्याबाबत समाज प्रबोधन यासाठी सातत्याने वर्षभर उपक्रम राबविले जातात. याबाबत प्रशालेचे राष्ट्रीय हरितसेना प्रमुख प्रमोद दत्तात्रय काकडे यांनी माहिती दिली.

अविस्मरणीय सूर्यग्रहण
या शतकातील पहिले सर्वात मोठे सूर्यग्रहण दि. २२ जुलै रोजी झाले. हे ग्रहण बघण्यासाठी मी वैभव जोशी व माझा मित्र शुभम मठकरी आणि रामदासी सर आम्ही पाटणा या ठिकाणी गेलो होतो. पुण्यातून २० जुलैला निघून आम्ही रेल्वेने २२ जुलैला पहाटे चार वाजता पाटण्याला पोहोचलो. भारतातील सुरत या ठिकाणापासून सुरू झालेले हे ग्रहण एका मिनिटात ९ किलोमीटर या वेगाने गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतून प्रवास करत पुढे चीन, जपान या देशांतून दिसले. पाटण्यामध्ये सूर्योदय पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी झाला. खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी गांधी मैदान या ठिकाणी जमलो.

समूहगीत स्पर्धेत भारती विद्यापीठ शाळा प्रथम
पुणे- चंद्र-सूर्य रंगभूमी, पुणे या संस्थेने ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या स्व. माधवराव ऊर्फ तात्या आगलावे स्मृती करंडक आंतरशालेय राष्ट्रभक्तिपर समूहगीत स्पर्धेत भारती विद्यापीठ प्रश्नथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रश्नस्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्य यांनी केले. आभार विश्वस्त अरविंद सूर्य यांनी मानले. सूत्रसंचालन प्रदीप पाटसकर यांनी केले.

पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा
हडपसर- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप प्रशालेने राखी पौर्णिमेनिमित्त विद्यालयाच्या आवारात असलेल्या झाडांना राखी बांधून आम्ही पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध आहोत, अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी केली. विद्यालयाच्या आवारात ५० वर्षापूर्वीच्या चिंच, गुलमोहर, कडूलिंब, अशोक अशा जुन्या व नव्या वृक्षांना राखी बांधून जतन करण्याची जबाबदारी विद्यार्थिनींनी स्वीकारली आहे. हे वर्ष विद्यालयाचे अमृतमहोत्सवी असल्याने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सविता काजरेकर यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणाबाबत त्यांनी मार्गदर्शनपर केले. पर्यावरणाविषयी काम करण्याची गरज आहे, शाळेमध्ये प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. झाडे जगवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीनी स्वत:वर काही बंधने घातली पाहिजेत, असे आवाहन काजरेकर यांनी केले. पर्यावरण मंडळाच्या प्रमुख अनिता आंबेकर, सुनीता गायकवाड, उपमुख्याध्यापिका रश्मी देशमुख, पर्यवेक्षक सुधाकर मुळे उपस्थित होते.

स्पेशल डिशेसची रेलचेल
शहरवासियांबरोबर उपनगरातील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्याने वातानुकूलित हॉटेलांनी पुण्यात आघाडी घेतली आहे. कुटुंबीयांसमवेत शांत, निवांत ठिकाणी हॉटेलमध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाचा आनंद म्हणजे एक पर्वणीच असते. शाकाहारी आणि मांसाहारींबरोबर गप्पा मारत एकाच ठिकाणी जेवणाचा आनंद लुटण्यासाठी बिबवेवाडी रस्त्यावरील वातानुकूलित हॉटेल अक्षयला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. सातारा रोड-बिबवेवाडीसारख्या विकसीत परिसरातील नागरिकांची गरज ओळखून अनेक व्यावसायिकांनी आपला मोर्चा हॉटेल आणि रेस्टॉरंटकडे वळविला आहे. त्यातीलच बिबवेवाडी रस्त्यावरील हॉटेल अक्षयने शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी खवय्यांसाठी उत्तम खाद्य सेवा देऊन ग्राहकांची पसंती मिळवली आहे.

----------------------------------------------------------------------------

भिंत ढासळून मुलगा मृत्युमुखी
पुणे, १४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

भवानी पेठेत रामोशी गेट पोलीस चौकीजवळील एका मशिदीची भिंत ढासळून आज संध्याकाळी एका १२ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाला. श्रेयश ऊर्फ सोनू रवी टिकारे (रा. भवानी पेठ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी. बी. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मशिदीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. रस्त्यालगतच्या एका भिंतीला लाकडी खांबांचा आधार देण्यात आला होता. श्रेयश हा दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. रस्त्याने जात असताना तो या भिंतीजवळ आला असता अचानक भिंत ढासळली. त्याखाली दबल्याने श्रेयसचा मृत्यू झाला. दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून संबंधित कामाच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

भाविकांनी धार्मिक स्थळी यात्रा करण्याचे टाळावे
पिंपरी, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’ या संसर्गजन्य आजाराचे संकट लक्षात घेता भाविकांनी धार्मिक स्थळी यात्रा करण्याचे टाळावे, असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र महाराज देव यांनी केले आहे. मोरगाव ग्रामपंचायतीने मोरगावात मास्क घातल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असा ठराव केला असल्याचेही देव यांनी कळविले आहे.

राष्ट्रवादीतर्फे तीनहजार जणांना आयुर्वेदिक औषधांचे वाटप
पुणे, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ मुळे नागिरकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरू नये आणि लोकांमधील रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी स्व. आमदार शिवाजीराव भोसले प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आयुर्वेद रसशाळेच्या सहकार्याने विविध प्रकारच्या चार औषधांचा संच गरजू रुग्णांना वाटण्याचा उपक्रम हाती घेतला असून आज पहिल्या दिवशी तीन हजार जणांना ही औषधे वाटण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष, सभागृहनेते अनिल भोसले यांनी ही माहिती दिली.

दशरथ वाळके यांचे निधन
पिंपरी, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ कुशाबा वाळके (वय ८२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, चार भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिघी गावच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने या परिसरातील नागरिकांनी दु:ख व्यक्त के ले.

स्वाइन फ्लू संदर्भात आणखी एक मदतकक्ष सुरू
पिंपरी, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ निगडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने स्वाइन फ्लू संदर्भात एक मदतकक्ष सुरू करण्यात आला आहे. शहरात स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांना या संदर्भात माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा मदतकक्ष सुरू करण्यात आला आहे. या मदतकक्षाचे औपचारिक उद्घाटन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष शिवेश आनंद, डॉ.अमोल मेहता, बालाजी अय्यर, रंगनाथन आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. महापालिका युद्धपातळीवर स्वाइन फ्लूच्या विरोधात काम करीत आहे. तथापि गैरसमजुतीतून नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करण्याच्या उद्देशाने पालिका आयुक्त आशिष शर्मा यांच्या विनंतीवरून हा मदतकक्ष सुरू करण्यात आला आहे, असे शिवेश आनंद यांनी सांगितले. यमुनानगरमधील पालिकेच्या दवाखान्यात फक्त स्वाइन फ्लूच्या रु ग्णांसाठी सोय करण्यात आली आहे.

श्याम मानकर यांना ‘विवेक’ पुरस्कार प्रदान
पुणे, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचातर्फे दिला जाणारा ‘विवेक’ पुरस्कार श्याम मानकर यांना रवींद्र माळवदकर यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. भारतीय राज्यघटनेची प्रत, एक पेन, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सत्काराला उत्तर देताना मानकर म्हणाले, की महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव असल्यानेच समाजहिताला प्रश्नधान्य देऊन गर्दीशिवाय साधा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनीही त्याला अनुकूल प्रतिसाद दिला, असे त्यांनी सांगितले. विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.