Leading International Marathi News Daily

शनिवार, १५ ऑगस्ट २००९

मेहकरजवळ जीप-कंटेनर अपघातात ६ जबर जखमी
मेहकर, १४ ऑगस्ट / वार्ताहर

पैनगंगा नदीच्या अरुंद पुलावरून प्रवासी जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात सहा गंभीर जखमी झाले. लोणारवरून मेहकरकडे वेगात येणारी जीप (एम.एच. २८- ४९५८) पैनगंगा नदीवरील पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना विरुद्ध दिशेने कंटेनर वेगात आले. जीपला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने जीप वळवली व ती सरळ १० फूट खोल जाऊन पाण्यात पडली.

बी. टी. देशमुख हतबल का झाले?
विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य बी. टी. देशमुख यांनी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ दिलेल्या राजीनाम्यामुळे शैक्षणिक वर्तुळाला चांगलाच धक्का बसला आहे. प्रश्नध्यापकांच्या मागण्यांसाठी बीटींनी राजीनामा द्यायला नको होता, प्रश्नध्यापकांच्या मागण्यांपेक्षा अजून बरेच महत्त्वाचे प्रश्न शिल्लक आहेत, असा सूर काही लोकांनी आवळला. प्रश्नध्यापकांना एवढय़ा पगाराची खरेच गरज आहे का? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला पण, अडीच दशकापासून विधिमंडळात अभ्यासपूर्ण मुद्यांवर मंत्र्यांना दरदरून घाम फोडायला लावणारे बीटी एकाक्षणी एवढे हतबल का झाले, याचा खोलात जाऊन विचार करायला हवा, प्राध्यापकांच्या मागण्यांशी जनतेचे काहीही घेणे-देणे नाही हे ठाऊक असतानाही बीटींनी राजीनामा देताना नेमका हाच विषय का निवडला? या प्रश्र्नाचे उत्तरही सहजरीत्या मिळणे शक्य नाही.

शस्त्रसाठा व साहित्य हस्तगत
एटापल्लीजवळ चकमकीत एक नक्षलवादी ठार
गडचिरोली, १४ ऑगस्ट / वार्ताहर
पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांत शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जोरदार चकमक उडाली. या चकमकीत १ नक्षलवादी ठार झाला असून ५ ते ६ नक्षलवादी गंभीर जखमी झाले. ही घटना एटापल्ली तालुक्यातील पेठा-कारमपल्ली गावादरम्यान जंगलात घडली.

जकात विरोधात अमरावती व अकोल्यात व्यापार बंद
अमरावती / अकोला, १४ ऑगस्ट / प्रतिनिधी

महानगरपालिका क्षेत्रातील जकात पूर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने अमरावती व अकोला शहरात व्यापार बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे बाजारपेठा ओस पडल्या. नागरिकांची आवश्यकता लक्षात घेता औषध दुकाने मात्र या बंदमधून वगळण्यात आली.

ग्रामीण पत्रकारांची उद्या कार्यशाळा
वाशीम, १४ ऑगस्ट / वार्ताहर

येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात रविवारी १६ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी ४ वाजतादरम्यान, ग्रामीण पत्रकारांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी सकाळचे कार्यकारी संपादक श्रीपाद अपराजित, देशोन्नत्तीचे रवी टाले, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माध्यम शास्त्र विभागाचे प्रपाठक डॉ. रमेश शेकोकार उपस्थित राहणार आहेत.

शिवभक्तांना मारहाण; मालेगावात कडकडीत बंद

बनावट कागदपत्रे सादर
शिष्यवृत्तीच्या नावावर सव्वा आठ लाख लाटले

पेनटाकळी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा

‘एचआयव्ही’ बाबत गैरसमज दूर करणार, अंजनगाव बारीत आज पालक सभा

‘आयडीबीआय’च्या भंडारा शाखेचा गौरव

अतिक्रमण हटवण्यासाठी आत्मदहनाचा इशारा

बल्लारपुरात ‘लॉयन्स क्लब’ने केले वृक्षारोपण

शिक्षण सभापतींच्या ‘मुक्ताफळां’नी शिक्षकांमध्ये नाराजी

कॉस्ट्राईब अध्यक्षपदी विजय मेश्राम

प्रवीण हिवरेंचा उद्या वर्धेत नागरी सत्कार

पीकविमा योजनेच्या मुदतवाढीतून फसवणूक

व्हिडिओकॉनच्या कामगारांवर उपासमारीची वेळ
सर्वानाच साकडे ; व्यवस्थापन ढिम्मच

मि. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट
.. माणसं भेटतच असतात.

त्यांच्यापैकी अनेकांच्या कर्तृत्त्वावर, कलागुणांवर, निर्णयांवर आणि त्या निर्णयांमुळे उमटणाऱ्या पडसाद तसेच परिणामांबद्दल बरंच बोललं जातं, लिहिलं जातं, या संपूर्ण प्रक्रियेत त्यांच्यातला माणूस मात्र,
दुर्लक्षितच राहतो. त्यांच्यातल्या माणूसपणाचा शोध अनेकदा घेतलाही जात नाही. संपर्कात आलेल्या अशाच काही
प्रथितयश व्यक्तींमधल्या माणसाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

फळे मधुर खावया..
दादाकाकाची फजिती ऐकून नेहाला गंमत तर वाटलीच, पण तिला नवलही वाटलं. हे सगळे मोठे लोक आपल्याला दर वेळी बजावत असतात ‘कीप कंट्रोल! मनाला आवर घाला! आणि मग त्यावेळी हीच मंडळी आपल्या ‘पॅशन’वर ‘कंट्रोल’ करत नव्हती! किंवा करू शकत नव्हती! पैजेसाठी हे काय? ..’ नेहाच्या मनातले विचार तिच्या आईच्या नजरेनं नेहाच्या चेहऱ्यावरून अचूक वाचले. तिच्या चेहऱ्यावर नजर रोखूनच तिनं विचारलं. ‘काय नेहा मॅडम? इथेच आहात ना! आमच्याबरोबर? का मनं पाखरू उडालं भुर्र्र..!’

अतिथ कोण?.. मी!
शुभदा फडणवीस

दरवर्षी पिठोरी अमावस्येला मातृदिनी आई माझ्या दोन्ही भावांना वाण द्यायची. खीर भरलेली चांदीची वाटी त्यावर साटोरीचं झाकण हातात घेऊन पाटावर बसायची आणि विचारायची अतिथ कोण?.. अतिथ कोण?.. अतिथ कोण?.. मी-मी-मी भाऊ म्हणायचे. ‘मी’ म्हणून झालं की सन्मानानं आई ते ‘वाण’ दोघांनाही द्यायची. मुलगी म्हणून आपल्याला ते मिळत नाही याचं वाईट वाटायचं., कारण कळायचं पण पटायचं मात्र नाही. आज ‘अतिथ कोण?’ चा अर्थ, त्या वाणाची महती समजते. पोळ्याचा दिवस अमावस्येचा. मुहूर्तवार-तिथी न बघता आईच्या पाठीमागे येऊन उभा राहणारा अतिथी तिचा मुलगाच.

गंमत प्रयोगांची , चुंबकत्व निर्मिती
मुलांनो चुंबकावर आधारित अनेक खेळणी तर आपल्याकडे असतात. चुंबकाचे विविध गुणधर्म जसे- उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर होणे, लोहकणांना आपल्याकडे आकर्षून घेणे हेही आपण जाणून आहोत, तर या चुंबकाच्या शोधाची एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगते, मॅग्नस नावाचा एक गुराखी डोंगरावर शेळ्या-मेंढय़ा राखत एका खडकावर उभा होता. त्यावेळी बुटाच्या लोखंडी खिळ्यांना खडकातून आकर्षण होत असल्याचे त्याला जाणवले.

मीरा
१६ एप्रिल २००९. देशाच्या राजकारणाचा सर्वात मोठा निर्णायक दिवस. राज्यकर्त्यां खासदारांचे भवितव्य मतपेटीत जमा होणारा तो दिवस. आदल्या दिवशी मतदारांच्या नावाच्या चिठ्ठय़ा घरोघरी पोहोचवण्याची धांदल. दुसरा दिवस बूथच्या बाहेर पेंडाल टाकून बसणे, मतदारांना ऑटो घेऊन घरून आणणे, परत पोहोचवून देणे. दोन दिवसांच्या या कामाची प्रत्येकालाच चांगली कमाई झाली होती. भाऊला शंभर रुपये मिळाले तर ताईला ३५० रुपये मिळाले होते. तिला माझ्यापेक्षा जास्त पैसे कसे मिळाले म्हणून तो ताईशी भांडू लागला.

धम्म संगिती
बौद्ध इतिहासाचे आणि तत्त्वज्ञानाचे निस्सीम अभ्यासक संजय डोंगरे लिखित ‘धम्म संगिती’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘बौद्ध धम्म संगिती’ म्हणजे बौद्ध धर्म परिषद, असेही म्हणता येईल. इतिहासातील चार बौद्ध महासभांचे विस्तृत विवेचन पुस्तकात आले आहे. बुद्ध जिवंत असेपर्यंत त्यांच्या अनुयायांचे शंका निरसन वेळीच होत असे. मात्र तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्षूंमध्ये काही तात्त्विक मतभेद वाढले. अशा संगितीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात विचारमंथन घडून आले. बुद्धाने सांगितलेले धार्मिक तत्त्वज्ञान, आचार, विहाराबाबतची नियमावली यांचे संकलन करणाऱ्या चार बौद्ध धर्म परिषदा अनुक्रमे ‘राजगृह’, ‘वैशाली’, ‘पाटलीपूत्र’ आणि काश्मिरातील ‘कुंडलवनात’ भरली.

स्वाईन फ्लूचा फंडा त्याला सावधानीचाच दंडा
माझ्या प्रिय आरोग्य साधक-वाचक मंडळींनो! महिन्यापूर्वी ‘डुकऱ्या ताप’ ऊर्फ ‘स्वाईन फ्लू’ फक्त आंतरराष्ट्रीय बातम्यांमधून ऐकण्या-वाचण्यात येत होता. पण आज तो भारतात फक्त प्रवेशच नव्हे तर बऱ्यापैकी थैमान घालत आहे. आज मुंबई-पुण्यात त्याने मांडलेला धुमाकूळ बघून मला ‘चिकन गुनिया’ची आठवण झाली. त्यावेळी वडिलांच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी, रडारड, लवकर औषधांसाठी भांडण, चिडचिड अनुभवली होती. जवळपास १ महिना मी त्यांच्या दवाखान्यात रिसेप्शन व आहार मार्गदर्शन देण्याचे काम केले. ‘चिकन गुनिया’ची साथ संतपा संपता ती मला बाधून गेली.
----------------------------------------------------------------------------

‘फायबर’ बोटीचे आज लोकार्पण
भंडारा, १४ ऑगस्ट/ वार्ताहर

खमारी- सुरेवाडा येथील दुर्घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी वैनगंगे काठच्या खमारी गावाला फायबर बोट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १ लाख रुपये किमतीच्या फायबर बोटीचे सुरक्षा जॅकेटसह १५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता आयोजित कार्यक्रमात लोकार्पण करण्यात येणार आहे.

ठक्कर बापा योजनेतून रस्त्यासाठी निधी मंजूर
भंडारा, १४ ऑगस्ट / वार्ताहर

भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ातील दुर्गम आदिवासी बहुल भागातील विकासकामांकरिता, शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्री पटेल यांच्या पाठपुराव्याची दखल घेत ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाकरिता हा निधी आहे. पाथरी (तुमसर), राजापूर, सीतासावंगी, मोहकारी, रोंधा, झारली, लवादा (लेंडेझरी), वीटपूर, खापा (आलेसूर), गोंडीटोला येथील रस्ते तसेच लेंडेझरी येथील समाजमंदिर या निधीतून बांधण्यात येणार आहे. रामपूर हमेशा, येदुरवुची, बोरगाव, पवनारा, पांगडी, गायमुख, सीतेकसा, सोंदेपूर, आसलपानी या गावातील कामही या योजनेच्या अंतर्गत झाली आहेत.

पारधी आश्रमशाळेस निकम यांची भेट
खामगाव, १४ ऑगस्ट/ वार्ताहर

सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेला अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी भैय्युजी महाराज उपस्थित होते. या भेटी दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कीर्तन, योगासन, तबला वादन, कराटे यांची प्रश्नत्यक्षिके सादर केली. अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. शालेय अभ्यासक्रमासोबतच संगीत, वादन, नृत्य विविध खेळ, चित्रकला, हस्तकला, संगणक यामधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अ‍ॅड. निकम यांनी कौतुक केले. भैय्युजी महाराजांच्या हस्ते अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजकुमार गोयनका उपस्थित होते.

श्रुती ‘क्लिनिकचे’ उद्घाटन
बल्लारपूर, १४ ऑगस्ट / वार्ताहर
येथील डॉ. भास्कर सोनारकर यांच्या श्रुती क्लिनिक व नर्सिग होमचे उद्घाटन बालाजी वॉर्डात नुकतेच नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावने यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप माकोडे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. रजनी हजारे, चंदनसिंह चंदेल, डॉ. सुभाष कुंभारे, डॉ. विजय कळसकर, महादेव भगत, राजू झोडे उपस्थित होते.

अर्जुनी मोरगावात रुग्णांना फळवाटप
गोंदिया, १४ ऑगस्ट / वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले होते. यावेळी बंडू भेंडारकर, शिवनारायण पालीवाल, राकेश जायस्वाल, नंदकिशोर चितलांगे, महेंद्र पालीवाल, चित्रलेखा मिश्रा, नितीन धोटे, यशवंत गणवीर, रत्नामाला कटोर, राधेश्याम साखरे, पनीराम राणे, भिवा मलग्राम उपस्थित होते.

पालक शिक्षक संघातर्फे वृक्षारोपण
कारंजा (घाडगे), १४ ऑगस्ट / वार्ताहर
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीदिनानिमित्त पालक- शिक्षक संघाच्यावतीने येथील मॉडेल हायस्कूलच्या प्रश्नंगणात वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय हरित सेना विभाग विद्यार्थी ग्राहक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमात भाग घेतला. यावेळी मुख्याध्यापक पी.पी. मोहोड, पालक सभेचे सचिव जयप्रकाश राऊत, उपाध्यक्ष नरेंद्र राऊत, सहसचिव रमेश दंडाळे, पर्यवेक्षक ए.जी. भादे, सुभाष निर्मल, हरित सेनेचे विलास वानखडे, बानाईत उपस्थित होते.

महादुला बिगर शेती पतसंस्थेची आमसभा
कोराडी, १४ ऑगस्ट / वार्ताहर
महादुला बिगर शेती पतसंस्थेची आमसभा संस्थेच्या सभागृहात नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी भाऊराव भालेराव होते. याप्रसंगी ठाकरे, राऊत, रामजी इंगोले, भुदेव वांढे, सूर्यभान काटकर, भुजंग ढेगरे, मनोहर इंगळे, विनोद राजुरकर, अशोक ठाकरे, दिनेश बोबडे आदी उपस्थित होते.

सेन्ट जॉन शाळेचे यश
पुलगाव, १४ ऑगस्ट / वार्ताहर

नुकताच जाहीर झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात स्थानिक सेन्ट जॉन हायस्कूल आघाडीवर राहिली. या शाळेचे एकूण ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले.शिष्यवृत्ती परीक्षेत ३३ विद्यार्थी बसले होते. पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विशेष गुणवत्ता यादीत शाळेचे विद्यार्थी प्रगती सुखिला, मयुरी झांझरी, विशाखा राठोड, शुभम जाधव, हेमंत दिवटे, ललित बहादुरे, प्रफुल्ल जाधव, प्रसाद अरक हे झळकले तर प्रगती सुखिला ही शहरात प्रथम तर वर्धा जिल्ह्य़ात तिसऱ्या क्रमांकावर आली. या यशाचे श्रेय प्रबंध संचालक शैलजा सुदामे, प्रश्नचार्य काळे, मार्गदर्शक चंद्रकांत ठाकरे यांना जाते.

आर्या बुराडेचा गुजरातमध्ये मृत्यू
भंडारा, १४ ऑगस्ट/ वार्ताहर

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माजी व्यवस्थापक संपतराव बुराडे यांची नात आर्या विनोद बुराडे हिचा वडोदरा (गुजरात) येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. आर्याचे वडील डॉ. विनोद बुराडे वडोदरा येथे एक खाजगी औषध कंपनीत नोकरीला आहेत.