Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  ‘ट्रान्स्फर फी’ला इन्कमटॅक्स नाही
  मुद्रांक अधिनियमातील सुधारणा
  घराचा पाया बांधकामाचा श्रीगणेशा - लॉरी बेकरबांधकाम
  ‘अविश्वास ठराव’ कायदेशीर बंधने
  वास्तुवृत्त
  मेलबॉक्स
  घर कौलारू : स्थितप्रज्ञ गुणेवाडा
  आठवणीतलं घर :
घर एका अवलियाचं..
 

चर्चा : कॉर्पस फंड आणि विनियोग

 

घर पाहावं घेऊन : आता बंगला हाच आमचा मोठा दागिना

 

घर कौलारू

 

‘ट्रान्स्फर फी’ला इन्कमटॅक्स नाही
सभासदाकडून सदनिका विकत घेतलेली आहे त्या विकत घेणाऱ्याने भरलेल्या ट्रान्स्फर फीवर प्राप्तिकर लागू होत असे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या दृष्टीने तुम्ही एकटय़ा सभासदाकडून ट्रान्स्फर फी वसूल करा अथवा सदनिका विकत घेणाऱ्याकडून किंवा दोघांकडून प्रत्येकी ५० टक्क्याप्रमाणे या कोणत्याही बाबतीत प्राप्तिकर लागू होणार नाही. मात्र ट्रान्स्फर फीची रक्कम महाराष्ट्र सरकारच्या ९-८-२००१ च्या प्रसिद्धिपत्रकातील आदेशानुसार असली पाहिजे. मुंबईत ही उच्चत्तम मर्यादा रु. २५ हजार इतकी आहे.
१७जुलै २००९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निणर्याने समस्त सहकारी गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या निर्णयानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्या आकारीत असलेल्या ट्रान्स्फर फीला यापुढे प्राप्तिकर भरावा लागणार नाही!
आतापर्यंत महाराष्ट्रातील प्राप्तिकर खाते व मुंबई लवाद मंडळ, विशेष न्यायपीठाच्या वाळकेश्वर त्रिवेणी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणातील निवाडय़ानुसार ट्रान्स्फर फीवर प्राप्तिकर वसूल करीत असे. या निवाडय़ाप्रमाणे एखाद्या सभासदाकडून ट्रान्स्फर

 

फी वसूल केली तर त्यावर प्राप्तिकर लागत नसे. पण ज्याने प्रचलित सभासदाकडून सदनिका विकत घेतलेली आहे त्या विकत घेणाऱ्याने भरलेल्या ट्रान्स्फर फीवर प्राप्तिकर लागू होत असे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या दृष्टीने तुम्ही एकटय़ा सभासदाकडून ट्रान्स्फर फी वसूल करा अथवा सदनिका विकत घेणाऱ्याकडून किंवा दोघांकडून प्रत्येकी ५० टक्क्याप्रमाणे या कोणत्याही बाबतीत प्राप्तिकर लागू होणार नाही. मात्र ट्रान्स्फर फीची रक्कम महाराष्ट्र सरकारच्या ९-८-२००१ च्या प्रसिद्धिपत्रकातील आदेशानुसार असली पाहिजे. मुंबईत ही उच्चत्तम मर्यादा रु. २५ हजार इतकी आहे. यापूर्वी वाळकेश्वर त्रिवेणी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत हे महत्त्वाचे तत्त्व विचारात घेतले होते की, जेव्हा प्रचलित सभासद संस्थेला ट्रान्स्फर फीचा भरणा करतो तेव्हा त्यांचा आपसातील समझोता असतो पण सदनिका घेऊ इच्छिणारी व्यक्ती व गृहनिर्माण संस्था यात असा कोणताही समझोता नसताना त्याच्याकडून वसूल केलेल्या ट्रान्स्फर फीवर मात्र प्राप्तिकर लागू होतो.
माननीय उच्च न्यायालयाने मात्र हे विचारात घेतले की ट्रान्स्फर फी मग सभासदाने भरलेली असो की, नव्या खरेदीदाराने त्यावर प्राप्तिकर लागू होत नाही म्हणून उच्च न्यायालयाने वाळकेश्वर त्रिवेणी सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबतचा निवाडा रद्दबातल ठरविला. अशा प्रकारे निर्णयाप्रत येताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले की, महाराष्ट्रातील बहुतेक सहकारी गृहनिर्माण संस्था महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायद्यातील अधिनियमाप्रमाणे आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपनियम बनवितात व त्याप्रमाणे संस्थेचा कारभार चालतो व संस्था ट्रान्स्फर फी वसूल करते. तीसुद्धा जर सदनिका विकत घेणाऱ्या व्यक्तीला सभासद म्हणून स्वीकृती मिळाली तरच! जर काही कारणाने सदनिका विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला नाही तर त्या व्यक्तीकडून घेतलेली ट्रान्स्फर फी परत करावी लागते, त्याचप्रमाणे जर ठराविक मर्यादेच्या वरती ट्रान्स्फर फीची रकम वसूल केली असेल तर ती त्या व्यक्तीला परत करावी लागते अथवा अशी जादा भरलेली रक्कम प्राप्तिकराला पात्र ठरते.
मुंबई उच्च न्यायालयाने हेदेखील विचारात घेतले की, ट्रान्स्फर फीची रकम सभासद भरो की ती
सदनिका विकत घेणारा संभाव्य सभासद भरो शेवटी ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फंडात जमा
होते व तो फंड इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी व सभासदांच्या सुखसोयींसाठीच खर्च केली जाते. व त्यात नफा मिळविणे हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा हेतू नसतो. अशा प्रकारे नफा जर मिळतच नसेल तर प्राप्तिकर लागू करणे हा शुद्ध अन्यायच आहे !!
अ‍ॅड. शशिकांत ढोले
लेखक संपर्क - ९८६७३५७७९४.