Leading International Marathi News Daily
रविवार, १६ ऑगस्ट २००९

प्रवासाचा वेग वाढेल
गुरू, राहूचं सहकार्य, पंचमात शनी आणि रवी-मंगळाचे राश्यांतर यामधून मेष व्यक्तींच्या कार्यपथावरील प्रवासाचा वेग वाढेल. नवे संपर्क, नवी चर्चा, नवे प्रस्ताव यांचा समावेश होईल; परंतु अचूक अंदाज येईपर्यंत या संबंधात कृती करू नका. शुक्रवारचे शुक्र राश्यांतर प्रपंचातील प्रश्न मार्गी लावण्यास उपयुक्त ठरेल. पैसा मिळेल, प्रतिष्ठा वाढेल. व्यापाराची घडी बसेल. जागा, वाहन यांची खरेदी संभवते. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : १६, १७, २०, २१ शुभ काळ.
महिलांना : समीकरणातील यश श्रेष्ठत्व सिद्ध करणारं ठरेल.

समीकरणात समस्या
भाग्यात गुरू, राहू आहे. बुध-शुक्राची राश्यांतरे आधार देतील, उत्साह देतील. तरीही चतुर्थात सुरू होणारा रवी, शनी सहयोग समीकरणात समस्या निर्माण करणारा आहे. त्याचे परिणाम प्रापंचिक शांती, शासकीय प्रकरण, आरोग्य, अधिकार यावर होणं शक्य असल्याने सत्य आणि संयम यांचा शनिवापर्यंत उपयोग करावा. मंगळ-हर्षल केंद्रयोगात शत्रूंची कारस्थाने, वाहनांचा वेग, गर्दीतील वाटचाल यावर दुर्लक्ष करू नये. सावधानता बाळगा.
दिनांक : १६ ते १९ अनुकूल काळ.
महिलांना : प्रयत्न, हुशारीने संधीचे सोने करता येईल.

पुढे सरकता येईल
रवी-मंगळाची राश्यांतरे गुरू-राहूची अनिष्टता रोखतील आणि शुक्र, शनीचं सहकार्य घेऊन मिथुन व्यक्तींना पुढे सरकता येईल. स्थगित योजनांना वेग देऊ शकाल. छोटे-मोठे प्रवास होतील. शेतीकार्यात यश मिळेल. उद्योगाचे बस्तान बसवता येईल. कला-करार नवा प्रभाव निर्माण करतील. राजकीय डावपेचाचं नवं स्वरूप निश्चित करता येईल. तरीही मंगळ-हर्षल केंद्रयोग होत असल्याने आरोग्य, वाहनांचा वेग यासंबंधात सावध राहणे योग्य.
दिनांक : १६ ते २० शुभ काळ.
महिलांना : सरळ मार्ग, स्पष्ट कृती यातून कर्तृत्व उजळून निघेल.

निर्धार उपयुक्त ठरेल
पुढे शनी, मागे मंगळ-सिंह राशीत रवी-केतू-कर्क व्यक्तींची कुचंबणा होत राहील. विवंचना वाढत राहतील. निर्णय - कृतीमध्ये संशयाचा समावेश होईल. आपण निर्धार आणि कुशलता यांचा उपयोग करावा. बुध-शुक्राची राश्यांतरं अनुकूल गुरू-राहू सहकार्य करतील. संभाव्य समस्यांमधून शनिवापर्यंत बाहेर पडणं शक्य आहे. संयम, प्रार्थना, सत्य हीच अस्त्र अटीतटीच्या प्रसंगात विजय मिळवून देणारी आहेत. स्पर्धा टाळा, प्रवास जपून करा. मंगळ-हर्षल केंद्रयोगाचा त्रास कमी होईल.
दिनांक : १७ ते २० संमिश्र घटनाचा काळ.
महिलांना : प्रवास होतील, आप्त भेटतील.

अनिष्ट प्रतिसाद
गुरू, राहूच्या नाराज प्रतिक्रिया रविवारपासून सुरू होणाऱ्या रवी-शनी सहयोगापासून तीव्र होतील. शुक्रवारचे शुक्र राश्यांतर त्यात संशय निर्माण करणार आहे. व्यावहारिक उलाढालीत प्रारंभापासूनच सतर्क राहून कृती करीत राहिलात तर प्रतिष्ठा सांभाळणारी सफलता शनिवापर्यंत मिळत राहणारी आहे. त्यामुळे सावकार, प्रपंच दिलेली आश्वासनं, ठरलेली कार्ये, धावपळीतही पूर्ण करता येतील. त्यातील प्राप्ती समाधान देणारी नसली तरी आपली दडपणं निश्चित कमी होतील.
दिनांक : १६, १७, २१, २२ शुभ काळ.
महिलांना : सहज सफलता मिळणार नाही.

प्रभाव वाढत राहील
गुरू-राहूची अनुकूलता, मंगळ-शुक्र-बुध यांच्या राश्यांतरामुळे व्यापक आणि शाश्वत परिणामांची ठरणार असल्याने अनेक प्रांतात कन्या व्यक्तींचा प्रभाव वाढत राहील. त्यात शिक्षण, साहित्य, व्यापार, कला-राजकारण यांचा समावेश राहील; परंतु रविवारपासून सुरू होत असलेला रवी-शनी सहयोग आरोग्य, अधिकार परिचित प्रतिष्ठित यांचे संबंधात प्रश्न निर्माण करील. समयसूचकतेने त्यावर मार्ग शोधू शकाल. खर्च मात्र वाढतच राहतील.
दिनांक : १६ ते १९ शुभ काळ.
महिलांना : समस्या सुटतील, समाधान लाभेल. सन्मान मिळतील.

समस्या सोडवता येतील
रवी- मंगळ- शुक्र यांची राश्यांतरं आणि शनीचं सहकार्य यातून अशक्य, अवघड समस्याही तुला व्यक्तींना सोडवता येतील. चतुर्थातील गुरू, राहूचा विरोध सध्या तरी प्रबळ ठरणार नाही आणि मंगळ- हर्षल केंद्रयोगाची तीव्रता सावध राहून संपवता येणार आहे. कला, विज्ञान, व्यापार, राजकारण यामध्ये तुला व्यक्ती आघाडीवर राहतील. अचानक प्रवास होतील. शत्रू- आप्त यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील, परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : १६ ते २० शुभ काळ.
महिलांना : प्रश्न भराभर सुटतील. प्रयत्नांचा वेग वाढवा. .

यशस्वी घटनांचा काळ
रवी, बुध, शुक्र यांची राश्यांतरं, अनुकूल शनी, पराक्रमी गुरू, राहू याच काळामध्ये कर्तृत्व उजळून काढणाऱ्या यशस्वी घटना घडत असतात. शनिवारच्या शुक्र, हर्षल नवपंचम योगापर्यंत प्रपंच ते परमेश्वर अशा अनेक विभागांत याचा प्रत्यय वृश्चिक व्यक्तींना येत राहील. दूरदृष्टीने याचा उपयोग केला तर आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, कला, साहित्यात नवी प्रतिमा स्थिर ठेवण्यातही यश मिळवता येईल. यश मिळत राहील.
दिनांक : १८ ते २२ महत्त्वपूर्ण घटनांचा काळ.
महिलांना : कराल ते यशस्वी ठरेल, असा काळ आहे.

प्रभाव चकित करील
गुरू, राहू, द्वितीयात आहे. भाग्यात शनी आहे. यांच्यातील प्रसन्न प्रतिक्रिया मंगळ, रवी, बुध यांच्या राश्यांतरातून व्यापक होत राहतील. धनू व्यक्तीचं कार्यविश्व त्यातून आकर्षक होत राहील. शनिवारच्या शुक्र, हर्षल नवपंचम योगाच्या आसपास काही घटनांना अनपेक्षितपणे अपेक्षित कलाटणी मिळेल आणि बौद्धिक, शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक वर्तुळात आपल्या प्रभावाने विरोधकही चकित होतील. तुमचा प्रभाव वाढेल.
दिनांक : १६, १७, २०, २१ शुभ काळ.
महिलांना : सांसारिक प्रश्न सुटतील, समाजात श्रेष्ठत्व सिद्ध होईल.

सफलता मिळेल
राशिस्थानी गुरू, राहू आणि बुध-शुक्राची राश्यांतरे यांच्यातील आधाराने इभ्रत संरक्षणात ठेवणारी सफलता शनिवारच्या शुक्र-हर्षल नवपंचम योगापर्यंत मिळत राहणार असली तरी अष्टमात सुरू होणाऱ्या रवी, शनी सहयोगाने दगाफटका करू नये यासाठी शत्रू आणि समस्या यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यात शक्तीपेक्षा बुद्धीचा उपयोग अधिक महत्त्वाचा ठरणारा आहे. प्रवास होतील. नवे प्रस्ताव समोर येतील. व्यापारात पैसा मिळेल. शुभकार्ये ठरतील.
दिनांक : १८, १९, २२ शुभ काळ.
महिलांना : प्रयत्नांती परमेश्वर हाच मंत्र उपयुक्त ठरणारा आहे.

अडखळत प्रवास
रवी-मंगळाचे राश्यांतर अनुकूल आहे आणि बुध-शुक्रातील बदल प्रश्न निर्माण करतील. त्यात व्ययस्थानी गुरू-राहू असल्याने कदाचित व्यवहारांतला प्रवास अडखळत करावा लागेल. छोटय़ा संधी मोठय़ा युक्तीने उपयोगात आणून प्रभाव टिकवून ठेवणे आवश्यक आहे. चुका, साहस, स्पर्धा असले प्रयोग सध्या तरी बंद करणे आवश्यक आहे. प्रकृतीवर दुर्लक्ष नको. देवाची आराधना मात्र उत्साह देत राहील. सप्तमातील शनी संकटात सहकार्य करील.
दिनांक : १६, १७, २०, २१ शुभ काळ.
महिलांना : सामोपचानाने समस्या सोडवणे फायद्याचे ठरणार आहे.

रागरंग बघा, पुढे चला
रवी-मंगळाचे राश्यांतर आणि बुध-शुक्रातील बदल मीन कार्यक्षितिजावर ऊन-पावसासारखे हवामान तयार करणार असल्याने रागरंग बघूनच निर्णय घेऊन कृती करणे आवश्यक ठरेल. त्यातूनच व्यापारी प्राप्ती, सामाजिक प्रतिष्ठा, बौद्धिक क्षेत्रातील प्रभाव यांना किमान संरक्षण देता येईल. त्यामध्ये लाभातील गुरू- राहू सहकार्य करतील. सत्याचा प्रयोगच प्रतिष्ठा मजबूत ठेवणारा राहील.
दिनांक : १८, १९, २२ शुभ काळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यश मिळेल. स्वत:वर विश्वास ठेवा.