Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

जगजीतसिंग यांची मैफल आता सप्टेंबर महिन्यात
ठाणे, १५ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने राज्यातील चित्रपट आणि नाटय़गृहे १६ ऑगस्ट

 

रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात रविवारी रात्री आठ वाजता आयोजित विख्यात गझल गायक जगजीतसिंग यांची पूर्वनियोजित मैफल रद्द करण्यात आली असून आता ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होईल, असे आयोजकांनी कळविले आहे.
अभंग प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच जगजीतसिंग यांचा लाइव्ह परफॉर्मन्स होणार होता. या मैफलीची सर्व तिकिटे विकली जाऊन दोन दिवसांपूर्वीच कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला होता. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे असतील, त्यांनी रविवारी संध्याकाळी आठ वाजता सावित्रीबाई फुले नाटय़गृहात येऊन घेऊन जावेत, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क- मोहन सुतावणे- ९८२०९५७५९९.