Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘मूषकांची मुंबई’ची ज्येष्ठ नागरिकांकडून गंभीर दखल
डोंबिवली, १२ ऑगस्ट /प्रतिनिधी

‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या ‘मूषकांची मुंबई’ या सदरामधील मजकुरावरून

 

महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्या, मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी बिल्डरांशी संगनमत करून जो धुमाकूळ घातला आहे, तो पाहता आदर्श राज्याची संकल्पना निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका रद्द करून महाराष्ट्रात अमर्याद काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी डोंबिवलीतील ९२ ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य नसेल तर किमान मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी. विकासाच्या अनेक संधी या भागात आहेत. परंतु, त्या जर राजकीय नेते, अधिकारी, बिल्डरांनी हडप करण्याचा प्रयत्न चालू केला असेल तर त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे, अन्यथा विकासकामांचा बोजवारा उडून महाराष्ट्रात येत्या काळात अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आर्किटेक्ट व ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पाध्ये यांच्या नेतृत्वाखालील ९२ ज्येष्ठ नागरिकांनी निवेदनात व्यक्त केले आहे.