Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नगरमध्ये शिवसेनेसह ठोक व्यापाऱ्यांची इतरांना सक्ती
शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दोन गट
नगर, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

जकातीच्या प्रश्नावर नगर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सरळ दोन गट पडले आहेत. सध्या संपावर असलेल्या आडतेबाजार, डाळ मंडईतील व्यापाऱ्यांनी आज शहरातील कापड बाजार सक्तीने बंद

 

करण्याचा प्रयत्न केल्याने हे मतभेद चव्हाटय़ावर आले.
दरम्यान, शिवसेनेने ठोक व्यापाऱ्यांची बाजू घेऊन संपाचीच सक्ती केल्याने कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व्यक्त होत आहे.
कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे, मात्र त्यात ते सहभागी नाहीत. आज त्यांची दुकाने बंद करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून कापडबाजारातील व्यापाऱ्यांना सक्ती करण्यास सुरुवात केली.
एका किराणा दुकानदाराला मारहाण करण्यात आली.
विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य न लक्षात घेताच शिवसेनेने संपकरी व्यापाऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रामुख्याने कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये त्याबाबत नाराजी आहे. आमदार अनिल राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड चौकात रास्ता रोकोचाही प्रयत्न झाला. त्यात व्यापाऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांचीच संख्या मोठी होती. या प्रकाराने ऐन स्वातंत्र्यदिनी शहरात काही वेळ तमावही निर्माण झाला होता.