Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मौलाना आझाद महामंडळाचे कर्जमाफीसाठी आंदोलन
सातारा, १५ ऑगस्ट / प्रतिनिधी

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमाफीचा अध्यादेश अद्याप न निघाल्याने अल्पसंख्याक समाज संतप्त झाला असून, याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र

 

आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी शमशुद्दीन आतार व कार्याध्यक्ष रशीदभाई बागवान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील विविध आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमाफीची घोषणा केली व तसे अध्यादेशही काढले. इतर सर्व महामंडळांना कर्जमाफीचे अध्यादेश प्राप्त झाले मग मौलाना आझाद महामंडळाच्या अध्यादेशाचे घोडे कुठे पेंड खात आहे, असा सवाल मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनने विचारला असून, या प्रश्नावर व्यापक लढा उभारण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.