Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

चित्रभाषेचा ‘पुंडलिक’ आता इतर भारतीय भाषांमध्येही!
विनायक परब
चित्रांची भाषा ही जगातील सर्वांत सुंदर आणि सहजसोपी भाषा आहे, असे म्हटले जाते. खरेतर ती समजून घेण्यासाठी कोणत्याही भाषेची गरज नसते. चित्रे काढायची असतील तर मात्र चित्रांची भाषा समजून घ्यावी लागते, त्याचे तंत्र अवगत करावे लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर सराव करावा लागतो. पण अनेकांपुढे प्रश्न असतो तो म्हणजे सुरुवात कुठून करायची? अशा वेळेस चित्रभाषेचा पुंडलिक आपल्या मदतीला धावून येतो, त्यांचे नाव पुंडलिक वझे.

..ते दिवस नोबेल पारितोषिक विजेत्यांबरोबरचे
जपानमधील ‘सायन्स सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्सुकुबा या शहरात नुकताच ‘एशिया सायन्य कॅम्प’ पार पडला. या कॅम्पमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना थेट नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी या कॅम्पची माहिती सांगणारा लिहिलेला हा लेख.

शिवशाहीच्या इतिहासाचा ‘निनाद’
छत्रपती शिवाजी महाराज व मराठेशाहीच्या इतिहासलेखनाची व इतिहासकारांची एक मोठी परंपरा आहे. त्याच प्रभावळीतले इतिहासकार निनाद बेडेकर यांच्या वयाला उद्या १७ ऑगस्ट २००९ रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतरच्या वर्षभरात निनाद बेडेकर महाराष्ट्रातील ६१ किल्ल्यांवर युवक व गडप्रेमींना घेऊन भ्रमंती करणार आहेत तसेच गडांचे जतन, इतिहासाबद्दल जागृती करणार आहेत. कवी भूषणाने शिवरायांवर केलेल्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखविणे तसेच शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य अशा विषयांवर पुस्तके लिहिण्याचा त्यांच्या बेडेकर यांचा मानस आहे. शिवस्मरणाने भारलेले उत्तम लेखक व फर्डा वक्ता असलेले निनाद बेडेकर यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचीत..

हुतात्म्यांच्या स्मरणाने श्रीगणेशा
प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून यंदा गणेशोत्सवात या चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या वारसदारांना गौरविण्यात येणार आहे.मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी सुरू केलेल्या चळवळीत २१ नोव्हेंबर १९५५ रोजी हुतात्मा चौकात ठिणगी पडली.

भंडारदरा- एक सुंदर पर्यटन स्थळ
पावसाळा! सर्वाचा एक अतिशय आवडता ऋतू. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी मित्रमंडळी, ऑफिस अशा सर्व ठिकाणी वर्षासहलीच्या गप्पांनी जोर धरला आहे. शहरापासून दूर जंगलात डोंगरदऱ्यांमध्ये अथवा कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद काही औरच असतो. असेच एक उत्तम पावसाळी सहलीचे ठिकाण म्हणजे भंडारदरा. मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरीच्या पुढे घोटी गावातून उजवीकडे वळायचे. महामार्ग सोडल्यापासून आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश करतो.

वडाळा वाहनतळ- प्रशासकीय फेऱ्यात
महाराष्ट्राचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी वार्ताहर परिषदेत एम.एम.आर.डी.ए.च्या विकासकामाच्या गतीबद्दल उघड उघड असमाधान व्यक्त केले. बॉम्बे मेट्रोपोलिटीन रिजनची विकास योजना प्रथम १९७० ते ९१ या कालावधीकरिता तयार करण्यात आली. भरमसाट वाढणारी लोकसंख्या, अपुऱ्या नागरी सुविधा, रस्ते, भविष्यात होणारे आर्थिक बदल, निर्यात वाढ, पर्यावरण या सर्वाचा विचार करून ही विकास योजना बनविण्यात आली, पण पूर्णत: अयशस्वी झाली. १९९६ ते २०११ या काळासाठी पुन्हा विकास योजना आखण्यात आली आहे.

नॉर्थ फेस ऑफ माऊंट एव्हरेस्ट
शाळेत असताना बहुतेक मुलांचा कंटाळवाणा विषय म्हणजे भूगोल. पण पुढे भविष्यात त्यातल्याच एखाद्या प्रश्नंताला, विशिष्ट स्थळाला आपण भेट देऊ अशी पुसटशी कल्पनाही कुणाला नसते, पण प्रत्यक्षात ते घडलं तर किती आनंद होतो हे सांगण्याची गरज नाही. माझ्या बाबतीतही तेच झालं. सर एडमंड हिलरी, आणि शेर्पा तेनसिंग यांनी सन १९५३ मध्ये पादाक्रांत केलेला ‘माऊंट एव्हरेस्ट’ आपण कधी अगदी जवळून पाहू शकू, असे चुकूनसुद्धा वाटले नव्हते. पण सुदैवाने दोन वर्षापूर्वी अचानक तो सुवर्णयोग आला आणि आम्ही तयारीला लागलो.

नागफणी
निसर्गाची किमया न्यारी! पक्षांनी- किटकांनी पाना-फुलांचे रंग घ्यावेत. फुलपाखरांनी त्यांचे वेल-बुट्टीदार ठसे घ्यावेत. तर पाना-फुलांनी कृतज्ञता म्हणून कधी पक्ष्यांकडून, कधी किटकांकडून, तर कधी फुलपाखरांकडून त्यांचे आकार आणि रचना घ्याव्यात. अशी ही निरपेक्ष देवाण-घेवाण फक्त निसर्गातच दिसू शकते! याचेच एक उत्तम उदाहरण आपल्या सह्याद्रीतही आढळते. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजे पहिल्या-दुसऱ्या पावसानंतर आपल्या डोंगरवाटांतून पांढरा फणा काढलेले नाग ‘उगवतात’. ही नागासारखी भासणारी फुलं आहेत ‘सापकांदा’ ऊर्फ Cobrality या सापकांद्याच्या फुलांचा आकार खरं तर ‘सापा’पेक्षाही एखाद्या फणा काढलेल्या नागासारखा दिसतो.

सलखनला जायचा योग एरवी आलाही नसता. खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी बहि:शाल शिक्षण विभागाची अभ्यास सहल वाराणसीला न्यायचे ठरवले तेव्हा मान्सूनच्या ऐन दंग्याच्या काळात ग्रहण दिसेल की नाही या शंकेचे मळभ मनावर होते. जवळजवळ तीस तासांचा प्रवास करून यायचे होते. एवढे करून हे नवलाईचे सूर्यग्रहण दिसणार की ठेंगाच मिळणार! मग ठरवले की केवळ ग्रहणावर आस ठेवून जाण्यापेक्षा अधिक काहीतरी पाहू. उत्तर भारताच्या हिशेबाने श्रावण अमावस्येच्या आधीच गंगाघाट किंवा देवळांच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते हे माहीत होते. वाराणसीच्या रस्त्यांवरही कावडियांचे जथ्थे उधळलेले असतात. त्या गर्दीच्या परिघाबाहेर जाऊन काहीतरी पाहावे म्हणून सारनाथ आणि सलखनचे जीवाश्म उद्यान अशी निवड केली.

‘झाँसी की रानी’ ‘झी’वर..
‘टीआरपी’ अधिक असलेल्या मालिकांमध्ये पुढीलपैकी एक तरी बाब ही असतेच असते- एक तर ती मालिका नाटय़मय असते किंवा त्यात बालकलाकार असतात, त्यात साहस असते किंवा त्यातील कथेला इतिहासाची जोड दिलेली असते.. यातील कुठलाही एक घटक हा त्या मालिकेला लोकप्रिय बनवण्यासाठी पुरेसा ठरतो. मात्र, लवकरच अशी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ज्यात यातील प्रत्येक घटक कलात्मकरीत्या पेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मालिकेवर प्रेक्षकांच्या लोकप्रियतेची मोहोर उमटेल की नाही, हे लवकरच निश्चित होईलच, मात्र मालिकेचा दर्जा नि त्याची कलामूल्यता यांच्याशी प्रश्नमाणिक राहण्याचा प्रयत्न ही मालिका तयार करताना लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि निर्माता मनापासून करताना दिसत आहेत. अलीकडेच या मालिकेची अधिकृत घोषणा जयपूरनजिक चोमू या ठिकाणी झीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वैद्य आणि प्रश्नेग्रामिंग विभागाचे प्रमुख अजय भाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.