Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

भारतीय स्वातंत्र्याचा हा लढा केवळ आपल्या देशातूनच नव्हे तर जे आपल्यावर राज्य करीत होते त्या ब्रिटनमधूनही चालवला गेला हे अनेकांना माहीत नसेल. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढय़ाची ही पताका अशीच फडकत ठेवली. त्यांच्यापैकीच एक होते मदनलाल धिंग्रा. अतिशय निश्चयी व अत्युच्च त्यागाची मूर्ती. जाज्ज्वल्य देशभक्ती त्यांच्या नसानसात भिनलेली होती. दुर्दैवाने त्यांच्या क्रांतिकार्याचा फारसा परिचय सामान्य लोकांना झालेला नाही त्यामुळे ते काहीसे उपेक्षित राहिले असे म्हणावे लागते. मदनलाल धिंग्रा १७ ऑगस्ट १९०९ मध्ये हसत हसत फासावर चढले. त्यांच्या या हौतात्म्याची शताब्दी या वर्षी पाळली जात आहे. त्यांच्या अतुलनीय त्यागाची ही कहाणी संस्मरणीय ठरावी अशीच आहे.भाखथथथरताला स्वातंत्र्य मिळाले पण त्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, हसत हसत ते फासावर चढले, देशाला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेतून त्यांनी मुक्त केले. अर्ज-विनंत्या, प्रार्थना करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही. क्रांतिकारकांनी जो सशस्त्र लढा आपल्या मायभूमीसाठी दिला त्यातूनच स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली आहे, त्यासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे.

सरहद्दीपलीकडील राजदूत
इइस्लामाबादेत नियाझ नाईक यांचा काही दिवसांपूर्वी झालेला खून त्यांच्या असंख्य मित्रांना आणि परिचितांना धक्का देऊन गेला. पाकिस्तानचे ते ख्यातनाम राजनैतिक प्रतिनिधी होते आणि आपल्या परराष्ट्र सचिवपदावरल्या निवृत्तीनंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुरळीत व्हावेत यासाठी पडद्यामागून मुत्सद्देगिरीचे निकराचे प्रयत्न केले. नियाझ नाईक यांचे विशेष हे की, त्यांच्यासारखेच अनेक मित्र आणि हितचिंतक त्यांना नवी दिल्लीत लाभले. कारगिलच्या युद्धानंतर परस्परांचे संबंध मूळ पदावर यावेत, यासाठी त्यांनी भारतीयांसमवेत काम केले. त्यांचा खून हा अमानुष होता आणि ज्यांना भारताबरोबरचे संबंध शांततेचे होऊ नयेत, असे वाटते, अशा पाकिस्तानी शक्तींनीच तो केला, असा संशय आहे. हालहाल करून त्यांना ठार करण्यात आले. नियाझ हे राजनीतिज्ञांचे राजनीतिज्ञ होते. खरेतर अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत. सभ्य शिष्टाचारी आणि अतिशय लाघवी, असे हे व्यक्तिमत्त्व! त्यांना मी ऑगस्ट १९६५ मध्ये सर्वप्रथम जीनिव्हात भेटलो.

‘मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना फाशी द्या हीच जनतेची भावना!’
मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या अल्पकालीन कारकीर्दीची तुलना मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे २०-२० मॅचशी करतात. इंडियन एक्स्प्रेसचे एडिटर इन चीफ शेखर गुप्ता यांनी एनडीटीव्हीच्या ‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली. मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर उभी ठाकलेली आव्हाने, पोलीस दलाचे आधुनिकीकरण तसेच ते अधिक सामथ्र्यशाली करणे, सी लिंक, आगामी विधानसभा निवडणुका अशा अनेक विषयांबाबत या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनमोकळी उत्तरे दिली. नव्यानेच बांधलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूस्थानी रिमझिम पावसाच्या सोबतीने एका प्रसन्न सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या मुलाखतीस प्रारंभ झाला. काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान तुम्हाला मिळाला आहे. मी किती तरुण आहे मला माहीत नाही, मात्र मनाने मी कायमच तरुण आहे.