Leading International Marathi News Daily

रविवार, १६ ऑगस्ट २००९

ठाण्याच्या चेहऱ्यावर होर्डिग्जचा लेप!
सोपान बोंगाणे

सौंदर्यासाठी मिळालेली पावती अभिमानाने मिरविणाऱ्या ठाणे शहराची गणना अवघ्या एका दशकाच्या प्रवासात विद्रूप शहर म्हणून व्हावी, यापरते दुर्दैव ते काय? शहर विद्रुपीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने ठाणे महापालिका आयुक्तांसह आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दंड ठोठावून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या भोंगळ व अनागोंदी कारभाराला सणसणीत चपराक लगावली.

कल्याण-डोंबिवलीत पागडीचा पगडा
आत्माराम नाटेकर

बांधकाम साहित्याचा खर्च भरमसाठ वाढला आणि मुंबईतील जागांचे भाव आकाशाला भिडले. कंपन्यांतील दिवाळखोरी, कामगार कपात यामुळे दिवसेंदिवस बेकारांची संख्या वाढू लागली. कमावता एक आणि खाणारी तोंडे चार या गणिताशी हातमिळवणी करणे सर्वसामान्य जिकिरीचे झाले.

गणपती.. नारळापासूनही!
प्रतिनिधी

गणेश चतुर्थीला, गणरायांचे आगमन होण्यास आता अवघा पंधरवडा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यानंतर गणरायांच्या मूर्त्यांचे कसे हाल होतात, याचा विचार या घडीला करणे तसे अप्रस्तुतच ठरेल. परंतु त्याच अनुषंगाने बदलापूरचे रमेश रामचंद्र दाते यांना नारळातील करवंटय़ांच्या गणपतीची कल्पना सुचली आणि याच विषयास पर्यावरणाच्या जागृतीची जोड देऊन त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात रुजविलीही.

मेघन खेडेकरची कहाणी..
प्रशांत असलेकर

त्याचं नाव आहे मेघन खेडेकर.
त्याची कहाणी सुरू होते त्याच्या जन्मापासून. जन्मानंतर वर्षभरातच त्याची आई वारली. वडील एका डबघाईला आलेल्या कंपनीत कामाला होते. तिथे सारखे संप व्हायचे. मेघनकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी दुसरे लग्न केले. ही सावत्र आई मेघनला कधी आपला समजलीच नाही. ती त्याच्याशी नेहमी रुक्षपणे वागायची.

शहिदांचे स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
रमेश पाटील

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहापैकी नऊ अतिरेक्यांना कंठस्नान घालताना शहीद झालेले पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांपासून नव्या पिढीला राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळावी यासाठी वाडा (जि. ठाणे) येथे पाच महिन्यांपूर्वीच भव्य शहीद स्मारक उभारण्यात आले आहे, परंतु या स्मारकाचे अनावरण करण्यास राष्ट्रप्रेमी नेत्यांना वेळ मिळत नसल्याने, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाते की काय, असा प्रश्न शहीद स्मारक उभारणाऱ्या समितीला पडला आहे.

चौथ्या पिढीची मोबाइल फोन सेवा..
डॉ.प्र.ज. जोगळेकर

भारतात अजून थ्री जी अर्थात तिसऱ्या पिढीच्या मोबाइल फोन सेवेच्या स्पेक्ट्रमच्या वाटपाचे आणि लायसेन्सचे काम पुढे सरकलेले नाही. अशा परिस्थितीत फोर जी चा विचार करणे हास्यास्पद आहे, असे काही लोकांना वाटण्याची शक्यता आहे, परंतु त्याचा आताच विचार सुरू केल्यास त्याचे पूर्वनियोजन सुसूत्रपणे करता येईल. या दृष्टिकोनातून भारत सरकारच्या दूरसंचार खात्याने फोर जी सेवेसाठी लागणारे स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्यासाठी प्रश्नथमिक पावले नुकतीच टाकली आहेत.

डोंबिवलीचे वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी
भगवान मंडलिक
डोंबिवलीत विविध पुरस्कार मिळविणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वे आहेत. या यादीत नव्हता तो ‘महाकवी कालिदास’ सन्मान. डोंबिवलीचे रहिवासी आणि ‘ऋग्वेदाचा मराठी शास्त्रीय अनुवाद’ या ग्रंथाचे अनुवादकार डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांना ३ ऑगस्ट रोजी शासनाने महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारातील ‘वेदमूर्ती’ हा सन्मान जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार नारळी पौर्णिमेस शासनातर्फे ‘संस्कृत दिवस समारोह’ साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने संस्कृत विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सात व परप्रश्नंतामधील एक अशा संस्कृत पंडितांचा शासनातर्फे ‘महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात येतो. यंदा डॉ. भीमराव कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पहिल्या बॉम्बस्फोटकर्त्यांच्या हौतात्म्याची शताब्दी!
भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करून प्रश्नणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक खुदीराम बोस. ११ ऑगस्ट १९०८ रोजी त्यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या या हौतात्म्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने स्वातंत्र्यलढय़ातील या क्रांतिपर्वाची सविस्तर हकिकत..१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, हे गुळगुळीत झालेले वाक्य प्रतिवर्षीच्या भाषणात सर्वत्र वापरले जाते. स्वातंत्र्य हे दान म्हणून कोणी पदरात टाकत नसते किंवा भीक म्हणून झोळीत टाकत नसते, ते मिळवावे लागते. त्यामुळे १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्य मिळवले असे म्हणायला हवे, मिळाले नव्हे! मिळाले या शब्दात दम आहे, आत्मविश्वास, पराक्रम आणि देशाभिमान आहे.