News Flash

अफ्रिकन सफारी

वनपर्यटनाची क्रेझ आज खूप मोठय़ा प्रमाणात विस्तारली आहे.

book04वनपर्यटनाची क्रेझ आज खूप मोठय़ा प्रमाणात विस्तारली आहे. पण साधारण ९० च्या दशकात हे सारचं बाल्यावस्थेत होतं. तेव्हा पीटर अ‍ॅलिसन नावाचा एक १९ वर्षीय तरुण अफ्रिकेत गेला. जवळचे पैसे संपले, काही दयाळू प्रवाशांनी त्याला लिफ्ट दिली. आणि वाटेतील एका जंगलातल्या कॅम्पवर त्याला नोकरी मिळाली. आणि त्याच्या आयुष्यातील एका विस्मयकारक प्रवासाची सुरुवात झाली. बार टेंडरचं काम काम करता करता तो टुरिस्ट गाइड झाला आणि जंगलातच रमला. त्याच्या या भन्नाट प्रवासाची हकिकत ‘सफारी आफ्रिकेतली, अनुभव सफर एका गाइडची’.. या पुस्तकात आहे.
त्याच्या साऱ्या लिखाणाला केवळ माझे थरारक अनुभव असा बाज न येता त्यातून जंगलाची एक वेगळी अनुभूती मिळते. महत्त्वाचे म्हणजे हे सारं काही पर्यटनाशी निगडीत असंच आहे. त्यामुळे केवळ साहसकथा न राहता एखाद्या पर्यटकाला काय काय पाहता येऊ शकेल त्याची ही उत्तम झलक आहे. पीटरचं जंगालाविषयीचं प्रेम तर आहेच, पण त्याचबरोबर त्याची स्थानिकांबरोबर जुळलेली नाळदेखील स्पष्टपणे जाणवते.
जंगल भटक्याचे अनोखे विश्व तर उलगडतेच, पण पर्यटक म्हणून एक वेगळी दृष्टीदेखील मिळते. आफ्रिकेतील जंगलाबाबतचे आपले गैरसमज दूर होण्यास आणि अनोख्या जगाविषयीची ओढ वाढण्यास मदत होते.
सफारी आफ्रिकेतील,
लेखक : पीटर अ‍ॅलिसन
अनुवाद : मंदार गोडबोले
मेहता प्रकाशन,
मूल्य : रु. २४०/-; पृष्ठे : २२०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:08 am

Web Title: aftican safari
Next Stories
1 सापांची मनोरंजक दुनिया
2 सहवास सारस्वतांचा!
3 त्रुटित जीवनी..
Just Now!
X