News Flash

मिझोरमचा वाटाडय़ा!

मिझोरम राज्यासमोरच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांचीही नोंद भावे यांनी या परिचयात घेतली आहे.

 

‘मनोभावे देशदर्शन’ या मालिकेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्किम, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरा या पूर्वाचलातील सात राज्यांची साक्षेपी ओळख करून देणाऱ्या स्वतंत्र पुस्तकांचे लेखक शशिधर भावे यांचे त्याच मालिकेतील ‘मिझोरम’ हे आठवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. पर्यटनकेंद्री विचारातून या पुस्तकातील माहितीचे संकलन झाले असले तरी त्यातून मिझोरमचे केवळ भौगोलिकच नव्हे तर ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक दर्शनही घडते. पुस्तकाच्या पूर्वार्धात मिझोरममधील संस्कृतीचा परिचय संक्षेपाने दिला आहे. पुरातन काळापासून सद्य:काळापर्यंतच्या मिझोरमच्या इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यांविषयी त्यातून कळतेच, शिवाय तिथल्या विविध जनजाती, त्यांच्या रीतीभाती, राहणीमान, खानपान, शिक्षणव्यवस्था, खेळ, सण-उत्सव, उद्योग-व्यवसाय यांचाही परिचय होतो. मिझोरम राज्यासमोरच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांचीही नोंद भावे यांनी या परिचयात घेतली आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात मिझोरम पर्यटनासाठी पंधरवडाभराचा कार्यक्रम दिला असून तो पर्यटकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. सोबत मिझोरममधील ९५ ठिकाणांविषयी टिपणं असून त्यात त्या त्या ठिकाणाचे वैशिष्टय़े, तिथल्या निवासाची व्यवस्था, प्रवासासाठी लागणारा वेळ आदी माहितीचा समावेश आहे. पुस्तकाच्या शेवटी नऊ परिशिष्टांमध्ये मिझोरममधील माहिती केंद्रे, इनरलाइन परवाने मिळण्याची ठिकाणे, सरकारी व खासगी निवासस्थानांची यादी, सण-उत्सवाचा काळ, मिझो व चकमा भाषेतील महत्त्वाचे शब्द व अंक यांचे उच्चार आदी उपयुक्त माहिती दिली आहे. एकूणच पर्यटकांसाठी हे पुस्तक वाटाडय़ा ठरू शकणारे आहे.

मनोभावे देशदर्शन : मिझोरम

  • शशिधर भावे, राजहंस प्रकाशन,
  • पृष्ठे- १४२, मूल्य- १६० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 5:19 am

Web Title: manobhave deshdarshan mizoram by shridhar bhave book
Next Stories
1 वाढदिवसाचा आराध्यवृक्ष
2 प्रेरणादायी आत्मकथन
3 बोधी नाटय़ चळवळीचे सारांश दर्शन
Just Now!
X