13 August 2020

News Flash

जातिसंघर्षांचे वास्तवदर्शन

सामाजिक स्थिती-गतीचा परामर्श घेणाऱ्या साहित्याची मराठीत मोठी परंपरा आहे.

सामाजिक स्थिती-गतीचा परामर्श घेणाऱ्या साहित्याची मराठीत मोठी परंपरा आहे. त्याच वाटेवरील वि. ल. कालगावकर यांची ‘शुभमंगल.. इत्यादी’ ही कादंबरी सुपर्ण प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच ‘मला म्हणावयाचे आहे की, जातिभेदाची समस्या ही एका व्यक्तीची, जातीची, जिल्ह्य़ाची, राज्याची समस्या नसून ती अखिल भारतीय समस्या आहे..’ हे यातील रामराव या पात्राचे वाक्य उद्धृत केले आहे. कादंबरीत रामरावच्या या म्हणण्याचा प्रत्यय येत जातो. जातिव्यवस्था, त्यातील विविध कंगोरे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखकाने या कादंबरीत केला आहे. आजवर जातिव्यवस्थेवर अनेक विचारवंतांनी केलेले भाष्य, जातिसंघर्षांच्या घटना यांचा त्यासाठी आधार घेतल्याचे लेखकाने मनोगतात म्हटले आहे. सिद्धार्थ आणि सरिता या दोघांच्या आंतरजातीय लग्नात येणारे कौटुंबिक, राजकीय दबाव व विरोध हा यातील कथानकाचा गाभा आहे. त्यातून सामाजिक, राजकीय, वैचारिक संघर्षांचे चित्रण आले आहे. तेरा प्रकरणांमध्ये विभागलेली ही कादंबरी जातिभेदासारख्या महत्त्वाच्या समस्येचे वास्तव दर्शन घडवते. परंतु कादंबरीत अनेक ठिकाणी असणारे मुद्रणदोष खटकत राहतात. शिवाय संपादन, अक्षरावली व मांडणी यांकडे अधिक लक्ष पुरवले असते तर कादंबरीला नेटके स्वरूप प्राप्त झाले असते.

‘शुभमंगल.. इत्यादी’ – वि. ल. कालगावकर, सुपर्ण प्रकाशन, पुणे

पृष्ठे- १९२, मूल्य- २५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2017 2:11 am

Web Title: reality of caste problems
Next Stories
1 अभिनेता विवेक यांचा कलाप्रवास
2 हास्य व कारुण्याची सांगड
3 शास्त्रज्ञाची रंजक चरित्रकथा
Just Now!
X