देशात १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलींनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल मोहिंदर सिंग यांना आणि गांधीवादी मूल्यांचा प्रचार केल्याबद्दल प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ एन. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय जातीय सलोखा पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मोहिंदर सिंग आणि एन. राधाकृष्णन यांना व्यक्तिगत वर्गवारीतील तर सेटंर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अ‍ॅण्ड सिक्युलॅरिझम, मुंबई या संस्थेची संघटना वर्गवारीतील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशात शीखविरोधी दंगली उसळल्या असताना दिल्लीत मोहिंदर सिंग यांनी मदतकार्य छावण्या उभारल्या आणि हिंदू व शीख यांच्यात सौहार्दता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाा. एन. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूतील गांधीग्राम विद्यापीठात शांती सेना कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. तामिळनाडू आणि केरळमधील जातीयदृष्टय़ा तणावपूर्ण असलेल्या परिसरात राधाकृष्णन यांनी मोलाची कामगिरी बजावली.