येत्या दोन वर्षांमध्ये देशात स्वयंपाकाच्या गॅसच्या आणखी १ कोटी मोफत जोडण्या दिल्या जाणार असून, जास्तीत जास्त लोकांना स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तेल सचिवांनी म्हटले आहे.

येत्या दोन वर्षांमध्ये गरजू लोकांना आणखी एक कोटी मोफत जोडण्या देण्याची आणि देशात जवळजवळ १०० टक्के स्वच्छ इंधन पोहोचविण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वयंपाकाचा गॅस जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे, असे तेल सचिव तरुण कपूर यांनी सांगितले.