News Flash

बांगलादेशात विमान कोसळून १ ठार

सदर विमानाने ९.४० मिनिटांनी उड्डाण करताच ते किनाऱ्याजवळ उपसागरात कोसळले.

रशियाचे खासगी मालवाहू विमान बुधवारी बंगालच्या उपसागरात कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानाचा अभियंता ठार झाला, तर नेव्हिगेटर गंभीर जखमी झाला आहे. विमानातील अन्य दोघे जण बेपत्ता आहेत.
सदर विमानाने ९.४० मिनिटांनी उड्डाण करताच ते किनाऱ्याजवळ उपसागरात कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने आम्हाला तसा संदेश पाठविला होता, दोन इंजिनांपैकी एक इंजिन बिघडले आहे, असे वैमानिकाने कळविले होते.
त्यानुसार आम्ही विमानतळावर तातडीने विमान उतरविण्यासाठी व्यवस्था केली, मात्र ते विमान उपसागरात कोसळले, असे विमानतळ व्यवस्थापक सधनकुमार यांनी सांगितले.विमान अभियंता कुलीस्न अ‍ॅण्ड्रिय याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर नेव्हिगेटर व्लोदिमीर कुल्तानोव्ह याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

एक कोटी रुपयांची लॉटरी अन्..
कोझीकोड: केरळ सरकारची लॉटरी बंगालच्या एका स्थलांतरित कामगाराला लागली असून, या २२ वर्षीय व्यक्तीस १ कोटी रुपये मिळणार आहेत. पश्चिम बंगालमधील माल्डा जिल्हय़ात लक्ष्मीपूरच्या मोफीजुल रहाना शेख यांनी कारुण्य लॉटरी तिकीट चार मार्चला खरेदी केले ते ५० रुपयांचे होते. वेल्लीमाडाकुनू येथे आल्यानंतर त्याने हे तिकीट घेतले असे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्याच दिवशी त्याची सोडत निघाली असता त्याला एक कोटीचे बक्षीस लागले. काल तो पोलीस स्टेशनला गेला व त्याने संरक्षण मागितले, कारण इतर कामगार त्याच्यावर हल्ला करून तिकीट हिसकावण्याची भीती होती. पोलिसांनी त्याला बँकेत नेले व खाते उघडून दिले व तिकीटही सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:40 am

Web Title: 1 dead in bangladesh plane crash
टॅग : Plane Crash
Next Stories
1 लष्कर -ए -तय्यबा व जैश विरोधात अमेरिका-भारत यांचे सहकार्य
2 जॉर्ज मार्टिन यांचे निधन
3 ‘एमक्यूएम’च्या ‘रॉ’शी संबंधांच्या आरोपांची पाकिस्तानकडून चौकशी
Just Now!
X