केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख जागा रिक्त आहेत. राजीनामे, निवृत्ती व मृत्यू यामुळे रिकाम्या जागांची संख्या वाढली आहे, असे राज्यसभेत सांगण्यात आले.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले,की सीमा सुरक्षा दलात २८९२६, केंद्रीय राखीव पोलीस दलात २६५०६, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात २३९०६, सशस्त्र सीमा बलात १८६४३, इंडो-तिबेट पोलीस दलात ५७८४, आसाम रायफल्समध्ये ७३२८ जागा रिकाम्या आहेत.  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवृत्ती, मृत्यू, राजीनामे यामुळे रिकाम्या जागांची संख्या वाढली आहे. काही दलांमध्ये नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यातील बहुतांश रिक्त पदे कॉन्स्टेबल स्वरूपाची असून या जागा भरण्यासाठी थेट भरती, बढती, प्रतिनियुक्ती या पद्धती वापरल्या जातात. सेवा भरती नियमाला अनुसरूनच या जागा भरण्यात येतील.