02 March 2021

News Flash

१६ दिवसात आढळले १० लाख रूग्ण; भारतात अमेरिका, ब्राझीलपेक्षाही रुग्ण वाढीचा वेग जास्त

दिलासादायक : दोन्ही देशांच्या तुलनेत मृत्यूचा आकडा कमी

संग्रहित छायाचित्र

देशात करोना विषाणूचं संसर्ग वेगानं वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. ही संख्या पार करणारा भारत अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ तिसरा देश ठरणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तिन्ही देशांमधील रुग्णसंख्येच्या वाढीची तुलना केली, तर अमेरिका व ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारतात मागील १६ दिवसांतच १० लाख रुग्ण आढळून आले आहेत.

ब्राझीलमध्ये करोना रुग्णांची संख्या २० लाखांहून ३० लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी २३ दिवसांचा कालावधी लागला होता. तर दुसरीकडे अमेरिकेतही रुग्णसंख्या २० लाखांहून ३० लाख होण्यासाठी २८ दिवस लागले होते. हे दोन्ही देश जगात सर्वोधिक करोना रुग्ण असलेल्या देशाच्या यादीत सर्वात वर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे.

दोन्ही देशांची तुलना केली, तर भारतातील रुग्णसंख्या २० लाखांहून ३० लाखांवर पोहोचण्यासाठी फक्त १६ दिवसच लागले आहेत. या आकडेवारीवरून भारतातील करोना रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याचं समोर आलं आहे. भारतात रुग्णांची संख्या १० लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप लागला होता. १३८ दिवसानंतर भारतातील रुग्णसंख्या १० लाखांपर्यंत गेली होती. अमेरिकेत ९८ दिवसांतच १० लाख रुग्ण आढळून आले होते. तर ब्राझीलमध्ये ११४ दिवसांमध्ये रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली होती.

१० लाख रुग्णसंख्येनंतर भारतातील रुग्णसंख्येचा वेग वाढला. २१ दिवसात रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाखांवर पोहोचली. दुसरीकडे अमेरिकेत ४३ दिवस, तर ब्राझीलमध्ये २७ दिवसांच्या कालावधीनंतर इतके रुग्ण आढळून आले होते. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची तुलना केल्यास भारतात दोन्ही देशांपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. ३० लाख रुग्णसंख्या असताना अमेरिकेत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तर ब्राझीलमध्येही १ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 3:34 pm

Web Title: 10 lakh coronavirus cases cross in 16 days bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दक्षिण चीन समुद्र: चीनकडून बॉम्बर विमाने तैनात, व्हिएतनामने भारताला दिली बिघडणाऱ्या स्थितीची माहिती
2 महत्त्वाची बातमी! ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षा वेळेतच होणार; NTA कडून शिक्कामोर्तब
3 इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला अटक, उत्तर प्रदेश ATS ची टीम दिल्लीत दाखल
Just Now!
X