25 January 2021

News Flash

पित्यानेच १० महिन्याच्या मुलीवर केला बलात्कार; मुलगी मेलीय की जिवंत आहे कसं ओळखू?, गुगलवर केलं सर्च

त्यानेच पोलिसांना फोन करुन मुलीचा श्वास बंद पडल्याची दिली माहिती

प्रातिनिधिक फोटो

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका पित्यानेच आपल्या १० महिन्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. मुलीवर बलात्कार केल्यानंतर कोणतीच हलचाल करत नसल्याचे पाहून या आरोपीने गुगलवर मुलगी मेलीय की जिंवत आहे हे कसं कळेल यासंदर्भातील सर्चही केलं. या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर दोन तासांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अंतर्गत जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणामध्ये २९ वर्षीय स्टीवन ऑस्टिन या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जारा स्क्राग या आपल्या १० महिन्याच्या मुलीवर ऑस्टिनने बलात्कार केला. ऑस्टिन एक फुटबॉल प्रशिक्षक आहे. ऑस्टिनविरोधात लैंगिक अत्याचार, मुलीवर बलात्कार करणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोंटगोमरी काउंटी जिल्हा न्यायालयातील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ऑस्टिनने पोलिसांना ९११ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करुन आपल्या मुलीचा श्वास बंद पडला आहे अशी माहिती दिली. ऑस्टिन मुलीला रुग्णालयात घेऊन गेला मात्र डॉक्टरांना तिचे प्राण वाचवता आले नाहीत. रुग्णालयाने यासंदर्भातील माहिती पोलिसांना कळवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्टिनच्या ब्राउजर सर्च हिस्ट्रीमुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ऑस्टिनने पोलिसांना फोन करण्याच्या एक तास आधी गुगलवर मुलगी जिवंत आहे की मेलीय हे कसं कळेल यासंदर्भात सर्च केलेलं. त्याने आपल्या मित्रांकडेही मेसेजच्या माध्यमातून यासंदर्भात मदत मागितली होती.

या लहान मुलीच्या डायरपरवर रक्ताचे डाग सापडल्याने पोलिसांना शंका आली. त्यांनी या डायपरच्या चाचण्या केल्या असता त्यांना त्यावर ऑस्टिनच्या विर्याचे अंशही सापडले. मुलीच्या शवविच्छेदन आणि ऑटोप्सी चाचण्यांमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. अंतर्गत जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालामध्ये म्हटलं आहे. या प्रकरणामुळे घरच्यांना प्रचंड धक्का बसला असून या मुलीची आई काही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. तर मुलीच्या आजी-आजोबांनी आम्ही अशी घटना घडेल असा कधी विचारही केला नव्हता अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 9:12 am

Web Title: 10 month old girl dies after being raped by her father who googled how do i know if a baby is dead scsg 91
Next Stories
1 “सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्यात कुणालाच रस नाही”
2 बलात्कारप्रकरणात गोवले!
3 अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर
Just Now!
X