News Flash

प्रवासी यादी जाहीर झाल्यानंतर शिल्लक आसनांवर रेल्वेकडून १०% सवलत

सर्व ट्रेनमधील तिकिटांवर लवकरच सूट

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रवाशांची यादी जाहीर झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या आसनांवर रेल्वेकडून लवकरच सवलत देण्यात येणार आहे. सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. प्रवाशांची यादी लावण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या आसनांवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही तिकिटे ट्रेन रवाना होण्यापूर्वी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत.

राजधानी, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये १५ डिसेंबरपासून ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार रिकामी आसनांवर निर्धारित तिकीट दराच्या १० टक्के सूट दिली गेली होती. फ्लेक्सी फेयर तिकीट सिस्टमच्या अंतर्गत ही तिकीटे सवलतीखाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. ट्रेनमधील प्रवाशांची यादी तयार झाल्यावर शिल्लक राहिलेल्या आसनांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती.

फ्लेक्सी फेअरमुळे ट्रेनची अनेक आसने शिल्लक राहतात. या सिस्टममुळे शेवटची काही आसने मूळ किमतीपेक्षा ५० टक्के जादा दराने विकण्यात आली होती. आता नव्या नियमानुसार प्रवाशांना तिकीटाच्या मूळ किमतीपेक्षा ४० टक्के अधिक रक्कम द्यावी लागेल. रेल्वेने सर्व फ्लेक्सी फेयर ट्रेनच्या तत्काळ कोट्यात १० टक्क्यांची सवलत दिली आहे. काही मार्गांवर तिकीटाचा दर जास्त असल्याने लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान राजधानी, शताब्दी आणि दुरन्तो ट्रेनमध्ये ५ हजार ८७१ आसने रिकामी राहिली होती.

‘एखाद्या प्रवाशाला यादी जाहीर झाल्यानंतर प्रवास करायचा असल्यास तो ४० टक्के अधिक दराने तिकीट खरेदी करु शकतो. फ्लेक्सी फेयरनुसार शिल्लक राहिलेल्या प्रत्येकी १० टक्क्यांसाठी तिकीट दर १० टक्क्यांनी वाढतो. हा नियम स्लीपर, एसी, २ एसी, एसी चेयर आणि ३ एसीसाठी लागू आहे. फर्स्ट एसी आणि एग्जीक्यूटिव क्लासमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही,’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 1:55 pm

Web Title: 10 percent rebate on vacant train berths
Next Stories
1 भविष्यात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रावर भारताचाच दबदबा असेल- पंतप्रधान मोदी
2 ‘यम’ बनून लोकांच्या मागे लागू नका!; नोटाबंदीवरून मायावतींचा मोदींवर हल्लाबोल
3 दाऊदच्या भारतवापसीचे प्रयत्न सुरु – राजनाथ सिंह
Just Now!
X