News Flash

लाल किल्ल्यावरील घटनेनंतर १०० आंदोलक शेतकरी बेपत्ता; एनजीओचा खळबळजनक दावा

पोलिसांनी केली अटकेची कारवाई

(छायाचित्र- गजेंद्र यादव)

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर येथे पंजाबच्या विविध भागातून आलेले सुमारे १०० हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने हा दावा केला आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पंजाब मानवाधिकार संघटना या एनजीओने दावा केला की, २६ जानेवारी रोजी मोगा येथील तातारुवाला गावातून १२ शेतकरी बेपत्ता झाले. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, खलरा मिशन, पंथी तालमेल संघटना यांच्याशिवाय पंजाब मानवाधिकार संघटना यांच्याशिवाय विविध संघटनांनी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली आहे.

१८ आंदोलकांना झाली अटक

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराबाबत आजवर १८ आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात पश्चिम विहार पोलीस स्टेशनमध्ये खटला दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या १८ पैकी सात जण पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील आहेत. अटक झालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी २३ जानेवारी रोजी आपलं घर सोडलं होतं. तसेच घरातून दोन ट्रॅक्टर घेऊन निघाले होते.

दिल्लीच्या शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले, मोगाच्या ११ आंदोलकांना नांगलोई पोलिसांनी अटक केली. त्यांची आता तिहार तुरुगांत रवानगी करण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, अलीपूर आणि नरेला भागात देखील अटकसत्र राबवण्यात आलं. भारतीय किसान युनियन (राजेवाल) गटाचे प्रमुख बलबीर सिंह राजेवाल यांनी म्हटलं की, शेतकरी संघटना प्रजासत्ताक दिनी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 6:32 pm

Web Title: 100 agitating farmers go missing after republic day incident the sensational claim of the ngo aau 85
Next Stories
1 APMC तील सुधारणांबाबतच्या विधानावर शरद पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
2 अमेरिकेने बोईंगला दिली घातक F-15EX फायटर विमानं भारताला विकण्याची परवानगी
3 शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर; पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन
Just Now!
X