05 August 2020

News Flash

लष्कराच्या विमानाने वुहानमधील १०० भारतीयांना मायदेशात आणणार

नवी दिल्ली : वुहान या चीनमधील करोना विषाणूग्रस्त शहरातील १०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेले लष्कराचे विमान पाठविण्यात येणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या

| February 21, 2020 12:11 am

नवी दिल्ली : वुहान या चीनमधील करोना विषाणूग्रस्त शहरातील १०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेले लष्कराचे विमान पाठविण्यात येणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले.

वुहानमधील आणखी भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारताने सी-१७ हे लष्करी वाहतूक विमान पाठविण्याची तयारी केली असून चीनकडून त्याला मान्यता मिळण्याची भारताला प्रतीक्षा आहे.

ज्यांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे त्यांना क्षमतेची मर्यादा पाहून चीनमधील दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्ही अन्य देशांच्या नागरिकांनाही सामावून घेणार आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:11 am

Web Title: 100 indians to be brought back from wuhan by military aircraft zws 70
Next Stories
1 तमिळनाडूत केरळ परिवहन महामंडळाची बस-ट्रक धडक, २० ठार
2 ओवेसींच्या व्यासपीठावरून तरुणीनं दिल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
3 ‘एसएपी’च्या दोन कर्मचाऱ्यांना ‘स्वाईन फ्ल्यू’ची लागण; मुंबईसह तीन ठिकाणची कार्यालये बंद
Just Now!
X