झिम्बाब्वेच्या मध्यवर्ती बँकेने त्यांचे जुने चलन खूपच कोसळत गेल्याने काही वर्षांपूर्वी रद्दबातल केले होते, कारण अमेरिकी डॉलरच्या तुलनेत चलन कमालीचे घसरले होते. आता या जुन्या नोटांच्या बदल्यात अमेरिकी डॉलर घेता येतील असा निर्णय मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. असे असले तरी  झिम्बाब्वेच्या १०० ट्रिलियन (अन्त्य) डॉलरच्या बदल्यात ४० अमेरिकी सेंट मिळणार आहेत, त्यामुळे चलन किती खाली जाऊ शकते याचा हा विक्रम आहे. झिम्बाब्वेने त्यांचे चलन अमेरिकी डॉलर व आफ्रिकी रँडच्या वर्चस्वाने २००९ मध्ये रद्द केले होते, त्या वेळी २३ कोटी टक्के चलनवाढ झाली होती. आता जुने चलन व्यवहारात आणल्यावर रस्त्यावरील फेरीवाल्यांनीही झिम्बाब्वेच्या चलनातील १०० ट्रिलियन (अन्त्य)डॉलरची नोट स्वीकारण्यास नकार दिला होता. झिम्बाब्वेच्या लोकांनी अजूनही जुन्या नोटा ठेवल्या असून त्यांना त्या बदल्यात डॉलर मिळू शकतील, पण चलनाची किंमत फारच कमी असल्याने तो आतबट्टय़ाचाच व्यवहार ठरणार आहे.