News Flash

ग्रीसमधील बोट दुर्घटनेत १०४ स्थलांतरितांचा मृत्यू

समुद्रातून आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या १०४ आहे.

मोठय़ा संख्येतील स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट ग्रीसच्या क्रेट बेटांच्या दक्षिणेकडील भूमध्य समुद्रात बुडाल्यानंतर शंभराहून अधिक लोकांचे मृतदेह लिबियाच्या पश्चिमेकडील झ्वारा शहराच्या किनाऱ्यावर वाहून आले आहेत. अद्याप बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध सुरू असून, मृतांचा आकडा वाढू शकतो असे तटरक्षक दलाने म्हटले आहे.
समुद्रातून आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या १०४ आहे. तथापि सर्वसाधारपणे एक बोट ११५ ते १२५ लोकांना वाहून नेत असल्यामुळे हा आकडा वाढू शकतो, असे लिबियन नौदलाचे प्रवक्ते कर्नल अयुब कासीम यांनी सांगितले. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
किमान ७०० स्थलांतरित लोकांना घेऊन ही बोट आफ्रिकेतून निघाली होती अशी माहिती असल्याचे ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन(आयओएम)ने म्हटले आहे. संकटात सापडलेल्यांची संख्या शेकडोंमध्ये असल्याचा अंदाज आहे.
दुर्घटनास्थळी फार मोठय़ा प्रमाणावर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणाहून जाणारी चार जहाजे त्यात सहभागी झाली असून, ग्रीसने दोन गस्ती नौका, एक लष्करी विमान व तीन हेलिकॉप्टर्स त्यासाठी पाठवली आहेत. स्थलांतरितांच्या बोटीतून संभाव्य बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू राहणार असल्याचे ग्रीसच्या तटरक्षक दलाने सांगितले.
लिबियामध्ये २०११ साली झालेल्या उठावात हुकूमशहा मोआमर कडाफी यांची सत्ता उलथून टाकण्यात आल्यानंतर या देशात माजलेल्या अनागोंदीचा फायदा घेऊन माणसांची तस्करी करणारे लोक स्थलांतरितांना भूमध्य समुद्रातून युरोपकडे वाहतूक करत आहेत.
या वर्षी जानेवारीपासून सुमारे २ लाख स्थलांतरित व निर्वासित यांनी भूमध्य समुद्र ओलांडून युरोपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या प्रयत्नात २५०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी बहुतांश लिबिया व इटली दरम्यानच्या प्रवासादरम्याने मेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 12:05 am

Web Title: 104 immigrants died in greece boat accident
Next Stories
1 बिचारे सिंग त्यांना तर स्वत:ची जन्मतारीखही माहिती नाही – जावेद अख्तर
2 ‘मॉडेलचा वापर करून हरियाणा पोलिसांकडून गँगस्टर संदीपची हत्या’
3 नरेंद्र मोदी उद्यापासून पाच देशांच्या दौऱ्यावर, ओबामांची भेट घेणार
Just Now!
X