29 May 2020

News Flash

करोनामुळे अमेरिकेत भीषण परिस्थिती, ११ भारतीयांचा मृत्यू

करोना व्हायरसमुळे अमेरिका अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना करत आहे. तिथली आरोग्य व्यवस्था पार कोलमडून गेली आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसमुळे अमेरिका अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना करत आहे. तिथली आरोग्य व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. या व्हायरसला रोखायचे कसे ? हाच अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणांसमोर आज मुख्य प्रश्न आहे. अमेरिकेत असलेल्या भारतीयांनाही या करोना व्हायरसचा फटका बसला आहे.

Covid-19 मुळे अमेरिकेत आतापर्यंत ११ भारतीयांचा मृत्यू झाला असून १६ भारतीयांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. Covid-19 मुळे अमेरिकेत आतापर्यंत १४ हजार पेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चार लाखापेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे.

करोनाची लागण होऊन अमेरिकेत ज्या भारतीयांचा मृत्यू झाला आहे, ते सर्व पुरुष आहेत. मृतांमध्ये न्यू यॉर्कमधील १० आणि न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचा समावेश आहे. ११ मृतांमध्ये न्यू यॉर्कमधील चार टॅक्सीचालक आहेत. न्यू यॉर्कमध्ये करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या शहरात करोनामुळे ६ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि १ लाख ३८ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे.

‘अमेरिका तुमचे उपकार विसरणार नाही’
करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदीत झाले असून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी नरेंद्र मोदींना फोन करुन करोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 10:44 am

Web Title: 11 indians die of coronavirus in us dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘तुम्ही करोना पसरवत आहात’, भरबाजारात महिला डॉक्टरांना मारहाण, लोक फक्त पाहत राहिले
2 मुथूट ग्रुपचा १५, ००० कुटुंबांना मदतीचा हात, मोफत अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचा केला पुरवठा
3 हनिमूनला गेलेलं कपल लॉकडाउनमुळे मालदीवमध्ये अडकून पडलं पण…
Just Now!
X