27 February 2021

News Flash

धारवाडनजीक मिनी बस-ट्रकच्या धडकेत ११ ठार

ठार झालेल्या ११ जणांमध्ये चालकाचा समावेश असून अन्य नऊ जण जखमी झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

धारवाड शहराजवळच्या इटिगट्टीजवळ शुक्रवारी मिनी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात नऊ महिलांसह ११ जण ठार झाल्याचे ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या अपघातामध्ये ठार झालेल्यापैकी बहुसंख्य जण दावणगेरे जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील होते आणि ते गोव्याला जात होते, असे धारवाडचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पी. कृष्णकान्त यांनी सांगितले. ठार झालेल्या ११ जणांमध्ये चालकाचा समावेश असून अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, जखमींच्या प्रकृतीत त्वरेने सुधारणा होवो, असे मोदी यांच्या कार्यालयातून ट्वीट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:22 am

Web Title: 11 killed in mini bus truck collision near dharwad abn 97
Next Stories
1 शेतकरी संघटना-सरकारमध्ये नवव्या फेरीची चर्चाही निष्फळ
2 मित्र देशानेच पाकिस्तानला दिला झटका, मलेशियाने PIA चं प्रवासी विमान केलं जप्त
3 ‘हाय वे’ वरील हॉटेलच्या वॉशरुममध्ये महिलेने बाळाला दिला जन्म
Just Now!
X