तामि़ळनाडूतील तिरूवल्लूर जिल्ह्य़ात २० फूट उंचीची कंपाउंड भिंत  शेजारच्या झोपडय़ांवर कोसळून चार महिला, एक मूल यांच्यासह ११ जण ठार झाले. मुख्यमंत्री जयललिता यांनी पोरूर येथे इमारत कोसळून ६१ जण ठार झाल्याच्या आधी घडलेल्या दुसऱ्या एका  घटनेची  ‘विशेष चौकशी पथका’मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
तिरूवल्लूरचे जिल्हाधिकारी के. वीर राघव यांनी उप्परापलायम या प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी रविवारी वार्ताहरांना सांगितले की, या घटनेत एकूण ११ जण जागीच ठार झाले असून त्यात चार महिला व एक मुलाचा समावेश आहे. मृतांमध्ये नऊ जण आंध्र प्रदेशातील असून उर्वरित तामिळनाडूचे आहेत. कुंपणाची भिंत खासगी वेअरहाऊसिंग कंपनीचे मालक रामनाथन व त्यांचा भाऊ बालू यांनी बांधील होती, त्यांना अटक करण्यात आली आहे