विमानप्रवासादरम्यान एका ११ महिन्यांच्या बाळाला श्वास घेण्यात अडथळा आल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कतार एअरवेजच्या दोहा-हैदराबाद या विमानात बुधवारी ही दुर्घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबाद विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृत बालकाचे नाव अर्णव वर्मा असून तो आपल्या पालकांसह कतारमधील दोहा येथून हैदराबादला येत होता. दरम्यान, श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद विमानतळावर पोहोचताच अर्णवला तातडीने अपोलो मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्याची तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अर्णव वर्मा या अकरा महिन्यांच्या बाळाला अमेरिकेचा पासपोर्ट मिळाला होता. तर त्याच्या आई-वडिलांकडे भारतीय पासपोर्ट आहे.

दरम्यान, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी एका बालकाचा मृत्य़ू झाल्याने आम्हाला दुःख झाले आहे, असे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. तर या घटनेमुळे अर्णवच्या कुटुंबियांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. त्याबद्दल हृदयापासून आम्ही त्यांचे सांत्वन करतो असे कतार एअरवेजने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 month old baby dies on board qatar airways plane after breathing problem
First published on: 26-09-2018 at 15:43 IST