News Flash

जम्मू-काश्मीर: शोपियाँमध्ये बस दरीत कोसळून ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू

यामध्ये ९ मुलींचा समावेश असून इतर ७ जण जखमी झाले आहेत.

शोपियाँ : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक मिनी बस दरीत कोसळून ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ९ मुलींचा समावेश आहे. तर इतर ७ जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली आहे.


माध्यमांतील वृत्तानुसार, पुंछ येथील एका कॉम्प्युटर कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मिनी बस शोपियाँ मार्गावरील मुघल रोडने जात होती. दरम्यान, एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ‘पिर की गली’ भागात ही बस दरीत कोसळली. यामध्ये एकूण ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये ९ मुलींचा समावेश आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी शोपियाँतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, राज्यात ही अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेशही मलिक यांनी प्रशासनाला दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 6:00 pm

Web Title: 11 students dead after minibus falls into gorge in jks shopian aau 85
Next Stories
1 जपानमध्ये नरेंद्र मोदींसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा
2 नीरव मोदीच्या कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ
3 संपत्तीवरुन गोदरेज कुटुंबात वाद; संपत्तीचे वाटप होण्याची शक्यता
Just Now!
X