राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ९४ जणांना पद्मश्री, १४ जणांना पद्मभूषण आणि चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, तीजन बाई, इस्माईल ओमर गुलेह, अनिल कुमार नाईक, बाबासाहेब पुरंदरे

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी – इस्त्रोचे शास्त्रज्ञ नांबी नारायण, माजी लोकसभा उपाध्यक्ष कारीया मुंडा, अभिनेते मोहन लाल, भारतीय गिर्यारोहक बच्छेंद्री पाल, खासगा हुकमदेव नारायण यादव, पत्रकार कुलदीप नय्यर यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी – दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेते मनोज वाजपेयी, फुटबॉलपटू सुनील छेत्री, दिग्दर्शक प्रभू देवा, क्रिकेटपटू गौतम गंभीर, गायक शंकर महादेवन आणि बजरंग पुनिया एकूण ९४ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. भारताला प्रत्येक पुरस्कार विजेत्याचा अभिमान आहे. तुम्ही देशाला आणि जगाला अधिक चांगले ठिकाण बनवले अशा शब्दात मोदींनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.