News Flash

म्यानमारमध्ये मोठा रक्तपात; एका दिवसात ११४ हून अधिक लोकांना ठार केल्याचे वृत्त

शांततेत निदर्शने करणाऱ्यांवर लष्कराच्या जवानांचा गोळीबार

छायाचित्र सौजन्य: एएनआय

म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडानंतर, शांततेत निदर्शने करणाऱ्यांवर लष्कराच्या जवानांनी शनिवारी मोठी कारवाई केली. लष्कराने एका दिवसात ११४ हून अधिक जणांना ठार केले आहे त्यामुळे शनिवार हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला.

बंडखोरीनंतर देशभरातील ४४ शहरांत सर्वात मोठा रक्तपात करण्यात आला. निदर्शकांच्या डोक्यावर आणि पाठीवर गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त टेलिव्हिजनने दिले आहे. असे असले तरी १ फेब्रुवारीला झालेल्या लष्करी बंडाच्या विरोधात निदर्शक यंगून, मंडाले आणि अन्य शहरांत रस्त्यावर उतरले होते.

१ फेब्रुवारीला म्यानमारच्या सैन्याने नागरी सरकार उलथून टाकले आणि राज्य सल्लागार आंग सॅन सू की यांच्यासह नागरी नेत्यांना ताब्यात घेतले.त्यासोबतच वर्षभराची आपत्कालीन स्थिती जाहीर केली. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि म्यानमारमधील यूएनच्या कार्यालयाने या हिंसाचाराविरोधात खेद व्यक्त केला आहे.

“सैन्यदलाविरूद्ध गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या शांततामय निदर्शकांवर लष्कराच्या तीव्र कारवाईचा परिणाम आज झाला आहे. या घटनेचा त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे.” युएन सरचिटणीसचे उप-प्रवक्ते फरहान हक यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हक म्हणाले की, “गुटेरेस यांनी नागरिकांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.”

म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे की, “देशभरात सैन्य दलाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारल्याचे कृत्य खरंच निंदनीय आहे, आज झालेली अनावश्यक हानी भयानक आहे.”

“हिंसा पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि ती त्वरित थांबवायला हवी. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांना याची दखल घ्यायला हवी आहे,” असे युएन कार्यालयाने सांगितले आहे. म्यानमारचे विशेष दूत क्रिस्टीन श्रानेर बर्गेनर म्हणाले की, शांतता सुनिश्चित करणे आणि जनतेचे रक्षण करणे ही कोणत्याही सैन्यदलाची जबाबदारी असली पाहिजे, परंतु टाटमाडॉ स्वतःच्या लोकांचाच विरोध करत आहे.” असे ते पुढे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 1:58 pm

Web Title: 114 civilians killed in myanmaar on the deadliest day since coup as military continues crackdown on protests sbi 84
Next Stories
1 संतापाचा कडेलोट! भाजपा आमदारावर शेतकऱ्यांचा हल्ला; कपडेही फाडले
2 क्रिकेटपटू मिताली राजने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार; म्हणाली, ‘हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण’
3 विमान हवेत असतानाच प्रवाशाने केला आपातकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; इतरांच्या काळजाचा ठोकाच चुकला
Just Now!
X