उत्तराखंड येथील उत्तरकाशीमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जण ठार तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस उत्तरकाशीहून विकासनगरला जात होती. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बस दरीत कोसळल्यानंतर जवळच्या गावातील लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी घटनास्थळी हेलिकॉप्टर पाठवून जखमींना उपचारासाठी डेहरादूनला हलवण्याच्या सूचना केल्या आहेत.