22 January 2021

News Flash

उत्तरप्रदेशात मोदींच्या ‘रन फॉर युनिटी’साठी गुजरातहून १२ अधिकारी रवाना

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी १२ अधिकाऱयांना उत्तरप्रदेशात पंधरा डिसेंबर रोजी होणाऱया 'रन फॉर युनिटी'च्या आयोजनासाठी रवाना केले आहे. या १२

| December 2, 2013 03:45 am

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी १२ अधिकाऱयांना उत्तरप्रदेशात पंधरा डिसेंबर रोजी होणाऱया ‘रन फॉर युनिटी’च्या आयोजनासाठी रवाना केले आहे. या १२ अधिकाऱयांमध्ये आयएएस, आयपीएस अधिकाऱयांचाही समावेश आहे.
‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून नरेंद्र मोदींचा महत्वकांक्षी जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी लागणारा निधी जमा केला जाणार आहे. या पुतळ्याची उंची १८२मी. असणार आहे. नर्मदा नदीवर उभारण्यात येणाऱया या पुतळ्याच्या उभारणीचा एकूण खर्च २,०७४ कोटी इतका अंदाजीत आहे. या पार्श्वभूमीवर वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टने नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली रन फॉर युनिटीची स्थापना केली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, या रन फॉर युनिटी ट्रस्टचे पदाधिकारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर उत्तरप्रदेशात ठीकठीकाणी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी प्रत्येकाने योगदान करावे असे आवाहन करणार आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2013 3:45 am

Web Title: 12 gujarat officers in up to promote modis run for unity
Next Stories
1 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्राला नोटीस
2 जनतेची दिशाभूल होण्यासाठी काँग्रेसची माझ्यावर टीका – मोदी
3 राणी एलिझाबेथपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत!
Just Now!
X