29 October 2020

News Flash

मुंबईहून हिमाचल प्रदेशात गेलेल्या 12 पैकी 11 ट्रेकर्सची सुटका, एकाचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात अडकलेल्या 12 ट्रेकर्सची सुटका

संग्रहित

मुंबईहून हिमाचाल प्रदेशात गेलेल्या 12 ट्रेकर्सपैकी 11 जणांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती समजते आहे. हिमाचल प्रदेशात हे ट्रेकर्स अडकले होते. इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या पोलिसांनी या सगळ्यांची सुटका केली आहे अशी माहिती समोर येते आहे. तर या 12 जणांपैकी एका ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. हर्षद आपटे असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. तो मूळचा बदलापूरचा होता.

मुंबईहून 12 ट्रेकर्सचा एक ग्रुप गिर्यारोहणासाठी हिमाचल प्रदेशात गेला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हा चमू बारशू ला पास या ठिकाणाहून हरवला होता. या सगळ्या गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. उत्तरकाशी आणि हिमाचल या ठिकाणी असलेल्या सीमा भागातून त्यांना सोडवण्यात आले आहे. ते परतत असताना हर्षदला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे पोहचण्याचपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. इंडो तिबेटियन सीमा भागातील पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे.

इंडो-तिबेटियन पोलिसांच्या 50 बटालियनच्या पोलिसांनी या सगळ्यांची सुटका केली आहे एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. उत्तराखंडच्या संकारी भागात हा चमू गेला होता. तिथून सांगला या हिमाचल प्रदेश येथील ठिकाणी जात असताना ते हर की दून या ठिकाणीही पोहचले. तिथून ते राणीकंदामार्गे चित्कुल या ठिकाणी जात होते आणि नेमके त्याचवेळी ते हरवले. दोन दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. मात्र इंडो तिबेटियन पोलिसांनी त्यांना सोडवले. त्यांच्या सुटकेसाठी बचाव मोहीमही सुरु करण्यात आली होती. मात्र बर्फवृष्टी होत असल्याने या बचाव आणि शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. अखेर त्यांची सुटका आता करण्यात आली आहे. हे सगळेजण मुंबईचे असून त्यांच्यामध्ये 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे अशीही माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 12:27 pm

Web Title: 12 mumbai trekkers rescued by indo tibetan border force in himachal pradesh
Next Stories
1 दहशतवाद्यांनी ठार केलेल्या औरंगजेब या शहीद जवानाचा अखेरचा व्हिडिओ समोर
2 ‘भाजपाच्या DNA मध्ये खोट आहे हे जनतेपर्यंत पोहचवा’
3 देशभरात आज रमजान ईदचा उत्साह!
Just Now!
X