वायव्य पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अडय़ावर सुरक्षारक्षकांनी केलेल्या कारवाईत १२ संशयित दहशतवादी ठार झाले, तर १५ जण जखमी झाले.
अफगाणिस्तानच्या सीमेजवळ दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण असल्याची माहिती लष्कराला मिळाली. वायव्य पाकिस्तानच्या अशांत भागात सध्या लष्करातर्फे एक मोहीम राबविण्यात येत आहे. या भागात इस्लामाबाद येथील भाजी मंडई, चरसड्डा आणि पेशावर पोलीसांवर हल्ला करणारे दहशतवादी या ठिकाणी लपल्याचा संशय आहे.