News Flash

धक्कादायक ! १२ वर्षाच्या मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न

बलात्कार करण्यात अपयश आल्यामुळे मुलाने चिमुरडीची हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

१२ वर्षाच्या मुलाने अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार करण्यात अपयश आल्यामुळे मुलाने चिमुरडीची हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात सीसीटीव्हीने महत्वाची भूमिका बजावली.

अल्पवयीन तरुणाने गळा दाबून चिमुरडीची हत्या केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने विटेच्या सहाय्याने चिमुरडीचा चेहरा ठेचला. १५ दिवसांपुर्वीच चिमुरडी आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी आली होती. मंगळवारी रात्री ती अचानक गायब झाली. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा सतत पॉर्न व्हिडीओ पाहत असायचा. तो सेक्स अॅडिक्ट झाला होता. तिथे मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस खऱ्या आरोपींना वाचवत असल्याचा आरोप करत आहेत. सीसीटीव्हीत दोन लोक मुलीला घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:19 am

Web Title: 12 year child attempt rape on two and half year old girl
Next Stories
1 औद्योगिक देश शिखर परिषद जी-७ रशियाचा पुन्हा समावेश हवा
2 ‘..तरच किम यांना व्हाइट हाऊसचे निमंत्रण’
3 बँकेत तरुणाने मागितले नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख, नकार दिल्यावर जाळून घेण्याचा प्रयत्न
Just Now!
X