News Flash

YouTube वर व्हिडीओ पाहून आगीच्या सहाय्याने हेअरस्टाइल करण्याच्या प्रयत्नात १२ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

केरळमध्ये घडला हा धक्कादायक प्रकार

प्रतिनिधिक फोटो (फोटो सौजन्य एएनआय)

केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या तिरुअनंतपुरमजवळील वेंगानूरमधील एका १२ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. शिवनारायण असं या मुलाचं नावं असून युट्यूबवर व्हिडीओपासून फायर हेअरस्टाइल करण्याच्या नादात हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

सातवी इयत्तेला शिकणाऱ्या शिवनारायण याने मंगळवारी युट्यूबवर केस सरळ करण्यासंदर्भातील एक व्हिडीओ पाहिला. त्यानंतर या मुलाने आपल्या केसांना रॉकेल लावलं आणि माचिसच्या काडीच्या मदतीने तो व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे केस सरळ करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच दरम्यान डोक्यावरील केस जळाने आणि शिवनारायण आगीच्या ज्वालांमध्ये होरपळून निघाला. शिवनारायणने जेव्हा हा प्रयत्न केला तेव्हा घरी फक्त त्याची आजी होती. घरातील बाथरुममध्ये शिवनारायणचे कसे जळू लागल्यानंतर तो आरडाओरड करुन लागला. त्याच्या आजीने आरडाओरड करुन आजूबाजूंच्या गोळा केलं. उपाचारासाठी शिवनारायणला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर युट्यूबवर लहान मुलं कोणते व्हिडीओ पाहतात याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केलं जात आहे.

१)

२)

सोशल नेटवर्किंगवर सध्या स्पिरिट आणि आगीच्या मदतीने हेअरस्टाइल करण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच प्रयत्न करताना शिवनारायणचा जीव गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 3:43 pm

Web Title: 12 year old boy dies aping hair straightening act in youtube in thiruvananthapuram scsg 91
Next Stories
1 “हा फक्त जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नाही,” सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया
2 छातीत दुखत असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल
3 दिलासादायक बातमी… १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु
Just Now!
X