News Flash

धक्कादायक ! १२ वर्षीय चिमुरड्याची बहिणीच्या बलात्काऱ्यांकडून हत्या

पटियाला येथील १२ वर्षीय चिमुरड्याच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पटियाला येथील १२ वर्षीय चिमुरड्याच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. १५ जून रोजी त्याच्याच घरात छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी अखेर आरोपींचा शोध लावला असून याप्रकरणी त्याच गावातील तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात हत्येपूर्वी त्यांनी चिमुरड्याच्या अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याचंही उघड झालं आहे.

गावातीलच एका अंत्यविधीला उपस्थित राहायचं असल्या कारणाने त्यादिवशी त्यांचे पालक घराबाहेर होते. चिमुरड्याची बहिण तेव्हा घरी एकटीच होती. आरोपींनी संधी साधत जबरदस्ती घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला.

यावेळी चिमुरडा घराबाहेर खेळत होता. घरी परतला असता गेट लॉक केला असल्याचं त्याने पाहिलं. भिंतीवर चढून त्याने घरात प्रवेश केला असता बहिणीवर बलात्कार होत असल्याचं त्याने पाहिलं. त्याने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याला पकडलं आणि गळा दाबून हत्या केली. ही आत्महत्या वाटावी यासाठी त्यांनी कपड्याच्या सहाय्याने मृतदेह छताला लटकवला.

दोघांचे पालक कामगार असून घरी आले असता त्यांनी मुलाचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना कळवलं. पालक आणि पोलिसांनाही सुरुवातीपासूनच ही आत्महत्या नसल्याचा संशय होता. सुरुवातीला पालकांना त्यांच्या काकांनी ही हत्य़ा केल्याचा संशय होता. अखेर पोलिसांनी तरुणीकडे आपला मोर्चा वळवला. चौकशीदरम्यान तिने पोलिसांना सविस्तर माहिती दिली. पीडित तरुणीकडून माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 11:32 am

Web Title: 12 year old murdered by sister rapist in patiala
Next Stories
1 कमल हासन यांनी घेतली राहुल गांधींची भेट, अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा
2 साईड दिली नाही म्हणून महिलेचा रिक्षा चालकावर गोळीबार
3 धरणे आंदोलनानंतर आजारी पडले केजरीवाल, उपचारासाठी जाणार बंगळुरूला
Just Now!
X