भारतामधलं ऑटोमोबाइलचं सगळ्यात मोठं प्रदर्शन अशी ओळख असलेलं ऑटो एक्स्पो 2018 नवी दिल्लीमध्ये भरत असून 20 देशांमधून सुमारे 1200 कंपन्या यामध्ये सहभागी होत आहेत. कार उत्पादक कंपन्यांप्रमाणेच सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्याही या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. भारतीय कंपन्या या प्रदर्शनात नवीन गाड्या दाखल करतात, त्याचप्रमाणे भविष्यात दाखल होऊ शकणाऱ्या कन्सेप्ट कार्सही लाँच करतात. दरम्यान, होंडा, सुझुकी आदी कंपन्यांनी आपली नवीन मॉडेल्स लाँच केली आहेत.
होंडा कंपनीने नवीन अमेझ, सी-आरव्ही लाँच केली आहे तर मारुति सुझुकीने कन्सेप्टफ्युचरएस सादर केली आहे. या प्रदर्शनातल्या पहिल्या दिवशीच्या महत्त्वाच्या घडामोडी…

पियाजिओनं सादर केली नव्या आकर्षक रुपातली व्हेस्पा स्कूटर

होंडानं सादर केली अक्टिवा 5जी. एलईडी हेडलाइट असलेल्या 5जी ची सीटखाली स्टोअरेज क्षमता 18 लिटरची आहे. तसेच या मॉडेसमध्ये मोबाइल चार्जिंगची सोयही आहे.

सुझुकी मोटरसायकलने बर्गमॅन ही स्कूटर आज सादर केली. जगभरात 125 ते 638 सीसी पर्यंत ही स्कूटर उपलब्ध आहे. भारतात मात्र 125 सीसी क्षमतेची स्कूटर सादर केली.

हीरो कंपनीनं एक्स प्लस ही मोटरसायकल या प्रदर्शनात सादर केली आहे. अॅडव्हेंचर बाइक म्हणून तिला सादर करण्यात येत आहे.

ह्युंदाईनं एलिट i20 सादर केली.

रेनाँ या कंपनीनं सादर केलेली नवी कार

रेनाँची ट्रेझर ही इलेक्ट्रिक कार सादर करण्याती आली