अहमदाबादमधल्या आनंद जिल्ह्यात १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यानं रसायन शास्त्राच्या पेपरमध्ये आपल्या लैंगिक सुखाचं स्वप्नरंजनाचं वर्णन लिहील्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचं महाविद्यालय हे गुजरात बारावी बोर्डाच्या अंतर्गत येतं त्याचा रसायनशास्त्राचा पेपर वाचून त्याचे परीक्षकही चाट पडले. इतकंच नाही तर त्याचा निकाल गुजरातच्या बारावी बोर्डानं रद्द केलं असून या विद्यार्थ्याला ‘मोबाईल पॉर्न अॅडिक्ट’ ठरविण्यात आलं आहे.

तसंच या सगळ्या प्रकरणी या मुलाच्या आई वडिलांना बोलावून गुजरात बारावी बोर्डाच्या सदस्यांनी त्याच्या आई वडिलांना त्याचा रसायनशास्त्राचा पेपरही वाचायला दिला. आपल्या मुलानं पेपरमध्ये जे लिहीलं होतं ते वाचून त्याच्या आई वडिलांनाही धक्का बसला. त्याचे वडिल शेतमजुरी करतात, तर आई घरीच असते. या मुलानं मला मोबाईल घेऊन द्या म्हणून तगादा लावला होता, तसंच तो कायम मोबाईलला चिकटलेलाच असायचा असा दावाही त्याच्या वडिलांनी केला आहे.

मी त्याला मोबाईल घेऊन देण्याच्या विरोधात होतो, पण त्याची आई म्हटली की तो महाविद्यालयात जातो त्यामुळे त्याला मोबाईल घेऊन द्या, या दोघांनीही तगादा लावल्यानं मी मुलाची मोबाईलची मागणी पूर्ण केली असंही त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. या सगळ्यानंतर मुलानंही मी मोबाईलवर कायम पॉर्न बघायचो अशी कबुली दिली आहे. तसंच आपल्या सेक्स फँटसी आपण रसायनशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत लिहील्या आहेत असंही या मुलानं म्हटलं आहे.

आम्ही त्याच्या शिक्षणासाठी काहीही करायला तयार आहोत, पैसे खर्च करतो आहोत, तो म्हणेल तो हट्टही पुरवत आहोत, अशात हा असा का वागतो? हे आमच्या समजण्यापलिकडचं आहे असंही या मुलाच्या आई वडिलांनी म्हटलं आहे. आमची ऐपत नसताना आम्ही त्याला शिकवतोय तो जे काही वागला आहे ते आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं या मुलाच्या आई वडिलांनी म्हटलं आहे.

१२ वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनं त्याच्या लैंगिक भावना आणि त्याविषयीचं स्वप्नरंजन आपल्या रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये अत्यंत रसभरित भाषेत लिहीलं आहे. एका सिनेमाच्या नटीसोबत, एका स्वयंपाक करणाऱ्या बाईसोबत आणि त्याच्या मेहुणीसोबत त्याच्या लैंगिक सुखासंबंधीचं स्वप्नरंजन रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये लिहीलं आहे. हे वर्णन वाचून त्याच्या शिक्षिकेला धक्का बसला. या शिक्षिकेनं या मुलाची तक्रार गुजरात शिक्षण मंडळाकडे केली. या सगळ्यांनी या मुलाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

सध्याच्या घडीला तरूण मुला-मुलींमध्ये मोबाईलवर पॉर्न बघण्याची सवय वाढताना दिसते आहे. ही बाब निश्चितच गंभीर आहे, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत मानसशास्त्रज्ञ डॉक्टर हंसल यांनी व्यक्त केलं पाहिजे