जोधपुरच्या बालेसरजवळ झालेल्या एका भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास १० जण गंभीर जखमी झाले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. बालसेर पोलीस स्टेशन हद्दीत आज (शुक्रवार) दुपारी मिनी बस व जीपमध्ये हा भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत घटनास्थळीच १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Rajasthan: 13 people die in a collision between a bus and a camper vehicle on Jaisalmer – Jodhpur Road near Dhadhaniya village in Jodhpur. 8 injured have been referred to a hospital in Jodhpur. Police is present at the spot, investigation is underway. pic.twitter.com/byxjDlH2Hd
— ANI (@ANI) September 27, 2019
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, जखमींना तातडीने बालसेर येथील रूग्णालयात हलवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे हा अपघात एवढा भीषण होता की, यातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
जैसलमरकडे जाणारी एक मिनी बस व समोर भरधाव येणाऱ्या जीपला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. अपघातानंतर चुराडा झालेल्या दोन्ही वाहनांमधील प्रवासी आतच अडकलेले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 3:58 pm