News Flash

धक्कादायक! १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, मित्र करत होते व्हिडीओ शूटिंग

पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

उत्तर प्रदेशात १३ वर्षाच्या अल्वपयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन आरोपी मुलीवर बलात्कार करत असताना इतर चार आरोपी व्हिडीओ शूटिंग करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी कारवाई करत सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी आपल्या घरी जात असताना आरोपींनी जबरदस्ती करत तिला एका निर्जन ठिकाणी शाळेच्या इमारतीत नेलं. आरोपींमधील दोघेजण पीडित तरुणी राहत असलेल्या ठिकाणी राहतात. त्यांनी तरुणीवर बलात्कार केली. यावेळी इतर चौघे आरोपी व्हिडीओ शूट करत होते”.

“सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आलेली असून चौकशी सुरु आहे. त्यांच्याविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पीडितेला घटनेबद्दल कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 2:10 pm

Web Title: 13 year old girl gangraped in uttar pradesh sgy 87
Next Stories
1 भाजपा धार्मिक पूर्वाग्रहांचा व्हायरस पसरवतेय; सोनिया गांधींचा आरोप
2 राष्ट्रपतींच्या पत्नीचाही करोनाविरुद्ध लढ्यात सहभाग, शेल्टर होमसाठी शिवतायत मास्क
3 लॉकडाउनमध्ये अडकलेला आजारी युवक भुकेने व्याकूळ, कुटुंबीयांना फोन करुन म्हणाला..
Just Now!
X