ओडिशा सरकारने रविवारी वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर १४ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ५ मेपासून ते १९ मेपर्यंत राज्यात लॉकडाउन असणार आहे. लॉकडाउन दरम्यान आवश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. याआधी राज्य सरकारने शहरी भागात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लॉकडाउन जाहीर केला होता.

ओडिशामध्ये गेल्या २४ तासांत ८०१५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर १४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ५६३४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहे असे राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारी सांगितले.

आणखी वाचा- भय इथले संपत नाही! रुग्णवाढीचा स्फोट कायम; साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू

ओडिसामध्ये आतापर्यंत एकूण ४ लाख ६२ हजार ६२२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ लाख ९१ हजार ४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर २०६८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात ६९,४५३ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.